साक्री तालुक्यात वेहेरगाव, होडदाणे गावांना चिकून गुनियाची शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:07 PM2018-04-09T13:07:31+5:302018-04-09T13:07:31+5:30

आरोग्य विभागाकडून उपाययोजनेवर भर : नियुक्त सर्वेक्षण पथके कार्यरत

Sakhri taluka in Wehergaon and Huddana villagers suspected of chicken currency | साक्री तालुक्यात वेहेरगाव, होडदाणे गावांना चिकून गुनियाची शंका

साक्री तालुक्यात वेहेरगाव, होडदाणे गावांना चिकून गुनियाची शंका

Next
ठळक मुद्देसाक्री तालुक्यातील चिकुन गुनिया आजाराची शंकाप्रभावी उपाययोजनेसाठी प्रशासनाची सज्जतानागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : साक्री तालुक्यात माळमाथ्यावर निजामपूरच्या पूर्वेस वेहेरगाव फाटा, होडदाणे येथे काही चिकून गुनियाचे रुग्ण आढळले. दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे गेल्या १५ दिवसांपासून पथके पाठवून रुग्ण सर्वेक्षण सुरू केले आहे. साथ वाढण्याआधीच नियंत्रणात आणली जाण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे.
साक्री तालुक्यातील वाघापूर, होडदाणे येथे चिकून गुनीयाचे काही रुग्ण आढळले. वाघापूर हे गाव दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नाही. तथापी डॉ़ सुधीर ठाकरे यांनी तातडीने वाघापूर येथे १५ दिवसांपूर्वी सर्वेक्षण पथक पाठवून शिबिर लावले. बाधीत काही रुग्णांवर उपचार केले. मागच्या चिकून गुनीयाचा भयंकर अनुभव लक्षात घेता अगदी सुरुवातीपासूनच नियंत्रणासाठी काळजी घेण्याची पाऊले उचलली असल्याचे डॉ ठाकरे यांनी नमूद केले. होडदाणे येथे दुसाणे केंद्राकडून लक्ष दिले जात आहे़ 
शुक्रवार,दि ६ एप्रिल रोजी जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ़ आऱ व्ही़ पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. बरेच रुग्ण वेहेरगाव फाटा, वाघापूर, होडदाणे येथील येत आहेत़ पण त्यात व्हायरलचे प्रमाण असून सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.
निजामपूर, जैताणे येथे चिकन गुनिया सदृश रुग्ण १५ दिवसांपासून  रोजगाव, उभरांढी, वाघापूर, वेहेरगाव फाटा येथील येत असल्याचे डॉ़ हेमंत पाटील, डॉ. मनीष गवळे यांनी नमूद केले. मात्र, स्थानिक असे रुग्ण नसल्याचे व यावेळी पूर्वी प्रमाणे रोगाची लक्षणेही दिसत नसल्याचे सांगण्यात आले़ आरोग्य विभागाकडून प्रभावीपणे उपाययोजना आखल्या जात आहेत़ नागरिकांनी देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे़ 

Web Title: Sakhri taluka in Wehergaon and Huddana villagers suspected of chicken currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.