कांदाप्रश्नी महाविकास आघाडीचे साक्रीत रास्ता रोको आंदोलन
By राजाराम लोंढे | Published: March 3, 2023 06:49 PM2023-03-03T18:49:39+5:302023-03-03T18:50:49+5:30
कांदाप्रश्नी महाविकास आघाडीने धुळे जिल्ह्यातील साक्रीत रास्ता रोको आंदोलन केले.
धुळे : शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला रास्त भाव मिळावा व प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान राज्य शासनाने शेतकऱ्यांना द्यावे व २०१८ वर्षाचे तालुक्यातील शेतकऱ्यांचे गारपीट नुकसानीच्या पंचनाम्याची ९७ कोटी नुकसानाचे अनुदान राज्य शासनाने त्वरित द्यावे याबाबत निवेदन तहसीलदार साक्री प्रवीण चव्हाणके यांना देण्यात आले. तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व मित्रपक्षतर्फे निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलान करण्यात आले.
कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड हवालदील झाला आहे. कांदा कवडीमोल भावाने विक्री होत आहे. म्हणून राज्य शासन केंद्र शासनाने यांनी त्वरित निर्यात बंदी उठवावी कांद्याला किमान ३००० रुपये भाव मिळावा व राज्य शासनाने १५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे या आमच्या मागणीचे नियोजन केंद्र सरकार व राज्य शासनाला कळवावे ही विनंती. तसेच २०१८ यावर्षी साक्री तालुक्यात गारपीट होऊन रब्बी पिंकांचे ९७ कोटी रुपयाचे नुकसानीचे पंचनामे झाले होते. पाच वर्षांपासून या अनुदानाच्या मागणी करण्यात येत आहे. कदाचित महाराष्ट्रात साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनुदान वितरित करण्यात आले नाहीत.
तरी त्वरित शेतकऱ्यांना अनुदान राज्य शासनाने वितरित करावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची दखल राज्य शासनाने त्वरित घ्यावी यासाठी आमच्या भावना व मागणीचे निवदेन राज्य शासनाला त्वरित कळवावे अशी पक्षीय सदस्यांनी मागणी केली. यावेळी या आंदोलनात माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी. एस. अहिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव देसले, रमेशबापू अहिराव, कामगार नेते सुभाष काकुस्ते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे, शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे, पं. सभापती शांताराम कुवर, उपसभापती माधुरी देसले, माजी उपसभापती ॲड. नरेंद्र मराठे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नरेंद्र तोरवणे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख किशोर वाघ, डॉ. दिलीप चोरडिया, विजय भामरे, शिवसेनेचे महिला नेते प्रियंका जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन सोनवणे, नगरसेवक बाळा शिंदे, गिरीश नेरकर, पिंटू देसले, भरत जोशी, विलास देसले, गणेश गावित, अक्षय सोनवणे, मंगेश नेरे, प्रज्योत देसले, रावसाहेब खैरनार, नितीन सोनवणे, पंकज सूर्यवंशी, सुहास सूर्यवंशी, धनराज सूर्यवंशी, हरीश मंडलिक, गिरीश नेरकर, अविनाश शिंदे, मनीष सोनवणे, करीम शहा, पंकज भामरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.