साक्री शहर टॅंकरमुक्त; ४० वर्षाची पाणीटंचाई दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 11:15 PM2023-04-14T23:15:21+5:302023-04-14T23:15:50+5:30
शहरात ठिक-ठिकाणी बोअरवेल केल्याने पाणीटंचाई दूर झाली असून साक्री शहर टँकर मुक्त झाले आहे.
साक्री शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शहरात वेगवेगळ्या सहा जागांवर बोअरवेल घेण्यात आले आहेत. माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून हे बोअरवेल घेण्यात आले आहेत. त्यापैकी प्रभाग क्रमांक ११ मध्ये बोअरवेलचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या हस्ते करण्यात आले. शहरात ठिक-ठिकाणी बोअरवेल केल्याने पाणीटंचाई दूर झाली असून साक्री शहर टँकर मुक्त झाले आहे.
यापूर्वीही आमदार अमरीशभाई पटेल यांनी स्वखर्चातून साक्री शहरात बारा ठिकाणी बोअरवेल करून दिले आहेत. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई दूर झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमरीशभाई पटेल यांनी अजून सहा ठिकाणी बोअरवेल करण्यासाठी स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपयांची मदत उपलब्ध करून दिली आहे.
प्रभाग क्रमांक ११ मध्ये आदिवासी वस्ती असून, आदिवासी बांधवांना पाहण्यासाठी वन वन भटकावे लागत होते. याच ठिकाणी अगोदर एक बोअरवेल घेण्यात आला आहे. त्यानंतर हा दुसरा बोअरवेलचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळेस उपनगराध्यक्ष तथा गटनेते बापूसाहेब गीते पाणीपुरवठा सभापती रेखा आबा सोनवणे, नगरसेविका उज्ज्वला विजय भोसले, उषाताई अनिल पवार, नगरसेवक दीपक वाघ पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, महिरचे सरपंच रमेश सरग, महेंद्र देसले, हर्षल बिरारीस, विजय भोसले सामाजिक कार्यकर्ते रंगा भवरे, अतुल दहिते, माजी नगरसेवक गणेश भिल, सामाजिक कार्यकर्ते धनराज चौधरी, अनुराग सोनवणे, सौरभ भोसले, शेखर भिल उपस्थित होते.