साक्रीत शेतक:यांनी रस्त्यावर दूध सांडले, कासारे आठवडे बाजार बंद
By admin | Published: June 2, 2017 01:17 PM2017-06-02T13:17:13+5:302017-06-02T13:17:13+5:30
शेतकरी संपाच्या दुस:या दिवशी शुक्रवारी साक्री येथे शिवसेनेतर्फे दूध हे विक्री न करता रस्त्यावर ओतून शेतक:यांच्या संपास आपला पाठिंबा जाहीर केला.
Next
ऑनलाईन लोकमत
साक्री/पिंपळनेर,दि.2 : शेतकरी संपाच्या दुस:या दिवशी शुक्रवारी साक्री येथे शिवसेनेतर्फे दूध हे विक्री न करता रस्त्यावर ओतून शेतक:यांच्या संपास आपला पाठिंबा जाहीर केला.
तालुक्यातील कासारे गावात शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. शिवसेनेने गावात फिरुन व्यापा:यांना आवाहन करुन आठवडे बाजार बंद केला. त्यामुळे आठवडे बाजाराच्या दिवशी गजबजून जाणारा चौकात शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शांतता दिसत होती. सर्व दुकाने बंद होती. शिवसेनेतर्फे तालुका प्रमुख विशाल देसले यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकत्र्यानी शेतकरी संपास पाठिंबा म्हणून कासारे आठवडे बाजार बंद ठेवले.