समाजवादीला काँग्रेस - राष्टवादी आघाडी सोबत घेणार - माजी आमदार राजवर्धन कदमबांडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 07:09 PM2018-11-07T19:09:40+5:302018-11-07T19:11:37+5:30

  धुळे  : राष्ट्रवादी पक्षाततर्फे शहरातील १९ प्रभागातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यामध्ये १९ प्रभागांसाठी ७४ जागेसाठी १९५ ...

Samajwadi will take Congress-Nationalist Alliance along with - Former MLA Rajvardhan Kadambande |  समाजवादीला काँग्रेस - राष्टवादी आघाडी सोबत घेणार - माजी आमदार राजवर्धन कदमबांडे 

 समाजवादीला काँग्रेस - राष्टवादी आघाडी सोबत घेणार - माजी आमदार राजवर्धन कदमबांडे 

Next

 

धुळे  : राष्ट्रवादी पक्षाततर्फे शहरातील १९ प्रभागातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यामध्ये १९ प्रभागांसाठी ७४ जागेसाठी १९५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत़ महापालिकेवर सत्ता कायम ठेवण्यासाठी  समाजवादीसह अन्य पक्षांनाही काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीसोबत घेणार असल्याची माहिती राष्टÑवादीचे नेते राजवर्धन कदमबांडे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.शहरात त्यामुळे दोन्ही पक्षांनी अर्ज वाटपासह मुलाखतींना सुरवात केली आहे़  राष्ट्रवादीने पहिल्यादिवशी  १ ते १९ प्रभागासाठी  दोनदिवसात १२२  उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या़ समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार त्यांनाही काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीसोबत घेण्याचा निर्णय जवळपास निश्चित आहे. मात्र यावर दिवाळीनंतर अंतिम निर्णय होऊन जागा वाटप आणि उमेदवार जाहीर करण्यात येतील, असे कदमबांडे यांनी सांगितले.  प्रभाग १६ मध्ये बहूसंख्य मुस्लिम व इतर समाज असल्याने इच्छूकांना कल या प्रभागाकडे जास्त दिसून येत आहे़  १९ प्रभागामध्ये त्या-त्या पक्षाचे वर्चस्व असलेल्या मित्र पक्षाच्या इच्छूक उमेदवारांना  सन्मानपूर्वक जागा देवून मनपावर राष्ट्रवादीचा झेडा फडकविणार आहे़  यंदाची  मनपा निवडणूक धनशक्ती व गुन्हगारीविरोधात लढा देणारी आहे़ त्यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार राष्ट्रवादी उभा करणार असल्याचे पक्षसुत्रांनी सांगितले़ 

Web Title: Samajwadi will take Congress-Nationalist Alliance along with - Former MLA Rajvardhan Kadambande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे