वाळू माफीया झाले फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:45 AM2021-04-30T04:45:53+5:302021-04-30T04:45:53+5:30
यावेळी तेथे दोंडाईचा भरारी पथकालादेखील पाचारण केले. यात दोंडाईचा मंडल अधिकारी एम. एम. शास्त्री, कलवाडे तलाठी एस. एस. कोकणी, ...
यावेळी तेथे दोंडाईचा भरारी पथकालादेखील पाचारण केले. यात दोंडाईचा मंडल अधिकारी एम. एम. शास्त्री, कलवाडे तलाठी एस. एस. कोकणी, मालपूर तलाठी विशाल गारे हेदेखील घटना स्थळी दाखल झाले यावेळी वाळूमाफियांनी धक्काबुक्की करत अंधाराचा फायदा घेत ट्रॅक्टर पळवून नेले. पळवून नेलेल्या ट्रॅक्टरचा माग शोधत भरारी पथकाने कर्ले गावात जाऊन यांचा शोध घेण्यात आला. यानंतर सकाळी दि. २९ एप्रिल रोजी दोन ट्रॅक्टर मालकांन विरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात जाऊन अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी प्रवीण उर्फ सोन्या प्रकाश देवरे रा. कर्ले ता. शिंदखेडा व अनिल भीमराव देवरे रा. कर्ले ता. शिंदखेडा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, अशी अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी लोकमतला माहिती दिली. तर दोंडाईचा पोलिसांकडून अद्याप या विरोधात गुन्ह्याची नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले.
या वाळूमाफियांनी उन्माद माजवला होता. वाळूने भरलेले भरधाव धावणारे ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी शेतकरी तसेच इतरांच्या अंगावर घेऊन जाऊन दहशत माजवली होती. यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी जात असताना शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. अपघात होऊन जीवितास धोका निर्माण झाला होता. म्हणून कार्यवाही होणे गरजेचे झाले होते.
या आधी प्रांत अधिकारी विक्रमसिंह बांदल यांच्या भरारी पथकाने यांना चांगला चोप लावला होता. रात्री पहाटे गस्त घालून या वाळूमाफियांमधे घबराटीचे वातावरण निर्माण केले होते. यानंतर पुन्हा यांनी डोके वर काढले होते. यासाठी कायदेशीर कारवाई करुन दहशत बसवणे गरजेचे झाले होते. कारण आमचे कोणाकडून काहीच होणार नाही असा प्रश्न पुन्हा उपस्थित होणार नाही व चांगल्या अधिकाऱ्यांची बदनामीदेखील थांबली. यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही होणे तेवढे गरजेचे होते. ती झाली म्हणून येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अमरावती मध्यम प्रकल्पाच्या बॅक वाॅटरचा भाग हा नंदुरबार महसूल विभागाचा भाग येतो तर वाहतूक ही दोंडाईचा अप्पर तहसील विभागातून होत असल्याचे दिसून येत होते. यासाठी दोंडाईचा मंडल अधिकारी महेशकुमार शास्त्री मालपूर व कलवाडे तलाठी यांनी कायमस्वरूपी सतर्कता दाखवून चांगला वचक बसवावा व येथील अवैध वाळूउपसा कायमस्वरूपी थांबवावा, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. या धाडसी धाडसत्राबद्दल या महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचे कलवाडे शिवारातील शेतकरी वर्गाने यावेळी कौतुक देखील केले.
फोटो :- मालपूर येथील अवैध वाळूवाहतूक करणाऱ्यांवर वेश बदलून कार्यवाहीसाठी आलेले दोंडाईचा अप्पर तहसीलदार सुदाम महाजन.