प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:28 PM2019-08-30T12:28:31+5:302019-08-30T12:33:50+5:30

पांझरेला आलेल्या महापुराचा फायदा : लाखो रुपयांच्या महसुलावर फिरतेय ‘पाणी’

Sand theft by rubbing the nose of the administration | प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू चोरी

पांझरा नदी काठावरील नकाणे रोडलगत सर्रासपणे ट्रॅक्टर घेऊन जावून वाळूचा उपसा केला जात आहे़ 

Next

धुळे : पांझरा नदीला आलेल्या पुरात मोठ्या प्रमाणावर वाळू वाहून आलेली आहे़ त्याचा फायदा उचलत वाळू माफियांकडून त्याचा बेकायदेशीरपणे उपसा सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमधून प्रकर्षाने समोर आला़ नकाणे रोड आणि बिलाडी रोड परिसरात हा प्रकार बिनधास्तपणे सुरु आहे़ परिणामी लाखो रुपयांच्या ‘महसुलावर’ पाणी फिरत आहे़ पांझरेच्या पुलावरुन अनेक अधिकाºयांचा वावर आहे़ एरव्ही कारवाई करणारे अधिकारी आता गेले कुठे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे़ 
महापुरामुळे वाळू आली वाहून
गेल्या आठवड्यात साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात पावसाचे प्रमाण यंदा जास्त होते़ परिणामी लहान मोठी धरणे ओसंडून वाहू लागली़ ते सर्व पाणी पांझरा नदीमध्ये आल्याने अक्कलपाडा धरण देखील भरले़ हे सर्व पाणी पांझरेत आल्याने महापूर आला़ त्यात कचºयासह मोठ्या प्रमाणावर वाळू वाहून आली आहे़ आता पावसाने उसंत घेतली आहे़ त्यामुळे पांझरेला आलेला महापूर देखील ओसरला आहे़ नदी कोरडी पडल्याने आता वाळू देखील दिसू लागली आहे़ परिणामी वाळू माफिया सरसावले आहेत़ रात्रीच्या वेळेस होणारी वाळूची चोरी आता भरदिवसा होऊ लागली असूनही प्रशासनाचे मात्र याकडे कानाडोळा आहे़ हीच बाब ‘लोकमत’ने हेरली़ 
पांझरा नदीकाठावरील स्थिती
गुरुवारी सकाळी ‘लोकमत’ चमूने शहरानजिक पांझरा नदी काठावरुन फेरफटका मारला़ त्यावेळेस पांझरेच्या पात्रात सर्रासपणे ट्रॅक्टर उतरविण्यात आले असल्याचे दिसून आले़ याच भागात काही ठिकाणी वाळू उचलण्यापुर्वी जाळी लावून ती स्वच्छ केली जात होती़ नदीत हा सर्व प्रकार सुरु असूनही कोणीही काहीही बोलायला तयार नसल्याचे समोर आले़ यावरुन त्यांची दहशत किती वाढली आहे, याचा प्रत्यय येतो़ पांझरा नदी काठावरुन नकाणे रोडलगत हा प्रकार कॅमेरात देखील टिपण्यात आला़ यानंतर ‘लोकमत’ चमूने आपली दिशा बिलाडी रोड भागाकडे वळविली़ याठिकाणी जावून पाहणी केली असता त्याच पध्दतीने वाळूचा सर्रासपणे उपसा सुरु असल्याचे प्रकर्षाने जाणवले़ या भागातून वावरणाºया दोघा-तिघांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात अधिक बोलणे टाळत तेथून मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला़ यावरुन वाळू माफियांची किती मोठ्या प्रमाणावर दहशत आहे, याचा प्रत्यय येतो़ 
वाळूचा छुपा साठाही शक्य
नदीपात्रात असलेल्या वाळूचा उपसा करुन काही वाळू माफियांनी घरालगत मोकळ्या जागेत त्याचा साठा करुन ठेवला असल्याची शक्यता नाकारता येत नाही़ भविष्यात वाळूची कमतरता जाणवेल तेव्हा हीच वाळूची साठेबाजी अधिक दराने वाळू माफियांनी लाभ मिळवून देवू शकते, असा बहुधा त्यांचा कयास असावा अशीही शक्यता नाकारता येत नाही़

Web Title: Sand theft by rubbing the nose of the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे