सांगवी शाळेचा निकाल ९९ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 08:07 PM2020-08-01T20:07:19+5:302020-08-01T20:07:35+5:30
शिरपूर : पिंटू पावरा विद्यालयात प्रथम
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील सांगवी येथील माईसाहेब लक्ष्मीबाई गोरखनाथ महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शालांत परिक्षेचा निकाल ९८़७० टक्के लागून पिंटू मुनीराम पावरा ९०़८० टक्के मिळवून शाळेत प्रथम आला़
अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचलित माईसाहेब लक्ष्मीबाई गोरखनाथ महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सांगवीचा शालांत परीक्षेचा निकाल ९८़७० टक्के लागला़ त्यात प्रथम क्रमांक पिंटू मुनीराम पावरा याने ९०़८० टक्के, द्वितीय क्रमांक चेतन हरीकलाल पाटील ८८़६० तर तृतीय क्रमांक प्रेम अशोक गोपाळ ८६़४० टक्के मिळविलेत़ १२ वी कला शाखेचा निकाल सुध्दा ९४़२३ टक्के लागला होता़ त्यात निशा मच्छिन्द्र कोकणी हिने ७७़६९ टक्के मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे़
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक अध्यापक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंगलाताई अरुणकुमार महाजन, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन अरुणकुमार महाजन, प्रा.अमरदिप महाजन, मुख्याध्यापक एम़एम़ परदेशी यांनी केले़