पोलीस ठाण्याबाहेर सॅनिटायझर कक्ष कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:28 PM2020-05-10T22:28:00+5:302020-05-10T22:28:21+5:30
स्तुत्य उपक्रम : कोरोनापासून बचावासाठी सर्वाेतोपरी प्रयत्न
धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरात थांबा, सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन प्रशासनाकडून केले जात असताना पोलिसांनी देखील त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे़ पोलीस अधीक्षक कार्यालयासह सर्वच पोलीस ठाण्याच्या बाहेर सॅनिटायझर कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ स्वच्छतेकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे़
गेल्या दीड महिन्यापासून कोरोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी जो तो आपआपल्या परिने प्रयत्न करीत आहेत़ घरीच थांबा, विनाकारण फिरु नका, असे आवाहन करण्यात येत आहे़ लॉकडाउन असलातरी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात आहे़ याशिवाय विनाकारण फिरणारे देखील फिरत आहेत़ त्यांना रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे़ याशिवाय काहींना काही समस्या घेऊन पोलीस ठाण्यात येणाऱ्यांची कमी-अधिक असलीतरी ती अजिबातच नाही असेही म्हणता येणार नाही़ प्रत्येक जण सॅनिटायझरचा वापर दैनंदिनमध्ये करतोच असेही ठोसपणे सांगता येत नाही़ तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील नागरीकांचा काहींना काही कामांसाठी वावर असतो़ त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय आणि शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनअंतर्गत सॅनिटायझर कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे़ त्याचा प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारे उपयोग केला जात आहे़
पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर अगोदर या कक्षात उभे राहून त्यांच्या अंगावर सॅनिटायझरची फवारणी होते़ ते झाल्यानंतर नेहमीप्रमाणे कामाला सुरुवात केली जाते़ तसेच पोलीस ठाण्यात येणाºया नागरीकांसाठी देखील ही सुविधा आहे़ जेणेकरुन कोणालाही लागण होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे़ पोलिसांच्या सुरक्षिततेला प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे़