संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात; बोराडीला नाशिक विभागाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

By अतुल जोशी | Published: February 21, 2023 06:52 PM2023-02-21T18:52:27+5:302023-02-21T18:52:32+5:30

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2020-21 व 2021-22 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत  बोराडी ता. शिरपूर  या ग्रामपंचायतीस नाशिक विभागातून प्रथम  क्रमांकाचा पुरस्कार जाहीर  झाला आहे .

Sant Gadgebaba in village cleanliness campaign; Nashik division first prize to Boradi | संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात; बोराडीला नाशिक विभागाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात; बोराडीला नाशिक विभागाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

googlenewsNext

धुळे -संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2020-21 व 2021-22 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत  बोराडी ता. शिरपूर  या ग्रामपंचायतीस नाशिक विभागातून प्रथम  क्रमांकाचा पुरस्कार जाहीर  झाला आहे .

 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2020-21 व 2021-22 अंतर्गत अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या   ग्रामपंचायतीची जिल्हास्तरिय समितीने तपासणी  केली होती . या तपासणीत जिल्ह्यात प्रथम आलेल्या बोराडी  ता. शिरपूर व द्वितीय आलेल्या म्हसदी ता. साक्री  या ग्रामपंचायतीची  विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेकरीता निवड झाली होती . नाशिक विभागातील इतर 4 जिल्ह्यातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायती देखील स्पर्धेत होत्या. विभागस्तरावरील विभागीय आयुक्त कार्यालय नाशिकचे  उपायुक्त (विकास)  मनोजकुमार चौधर यांच्या अध्यक्षतेखालील त्री सदस्यीय  समितीने या ग्रामपंचायतीची तपासणी केली होती . या समितीत विस्तार अधिकारी अनिल राणे , दीपक मोरे यांचा समावेश होता. यावेळी समितीने  शाळा , अंगणवाडी   , पिण्याचे पाण्याचे स्त्रोत , सार्वजनिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामे,   आदी कामांची पाहणी केली होती .

तपासणी समितीने प्रदान केलेल्या  गुणांच्या आधारे नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकताच विभागस्तरीय निकाल जाहीर केला असून यात  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत बोराडी ता. शिरपूर  या ग्रामपंचायतीस नाशिक विभागातून प्रथम  क्रमांकाचा पुरस्कार जाहीर  झाला आहे .श्रीरामपूर ता. जि . नंदुरबार या ग्रामपंचायतीस दुसऱ्या  क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केले आहे . तर गनेगाव ता . राहुरी  जि . अहमदनगर यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. बोराडी ग्रामपंचायतीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत  अंतर्गत  विभागस्तरावरून बारा लक्ष रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतीस मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा सौ. अश्विनीताई पाटील, उपाध्यक्ष श्री देवेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. श्री. तुषार रंधे,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.  , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रकांत पवार , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक  श्री आर.एस  लोखंडे, , पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप पवार शिरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय सोनवणे यांच्यासह सर्व  तज्ञ, सल्लागार,अधिकारी पदाधिकाऱ्यांनी सरपंच सुकदेव भिल,उपसरपंच राहुल रंधे ,  ग्रामसेविका डी आर पेंढारकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या भरीव  योगदानाचे  कौतुक केले आहे, आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Sant Gadgebaba in village cleanliness campaign; Nashik division first prize to Boradi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे