सरपंच धरती देवरेंना रोजगार निर्मिती पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 04:21 PM2019-02-22T16:21:47+5:302019-02-22T16:22:24+5:30
धुळे तालुक्यातील बोरीस गावात रोजगार उभारण्यात पुढाकार
धुळे तालुक्यातील बोरीस गावातील गरजू महिलांना गावानजीक असलेल्या श्री गणेश टेक्सटाईल्समध्ये रोजगार उपलब्ध करण्यात ग्रा.पं.ने पुढाकार घेतला. त्यासाठी मंजू गुप्ता फाऊंडेशनतर्फे दोन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्या महिलांना गारमेंट क्षेत्रात रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे. वीजबचतीसाठी एलईडी पथदिवे, वॉटरकप स्पर्धेतील पाणी बचतीच्या खेळांच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातून गावातील शाळेची निवड, मुख्य रस्त्यासह गावातील ७० टक्के रस्त्यांचे कॉँक्रीटकरण, घंटागाडीद्वारे कचरासंकलन, वैयक्तिक शौचालयांसह सार्वजनिक शौचालय, पिण्यासाठी शुद्ध पाणी, आरोग्य शिबिरे, बंदिस्त गटारी, वेळोवेळी लसीकरण, प्रत्येक घरास वीज, प्रत्येक चौकात दिवाबत्तीच्या सोयीसह दुरुस्ती, प्रत्येक घरास पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी केलेली आहे. ग्रामसभेद्वारे अवैध धंद्यांना पायबंद, वृक्षसंवर्धनासाठी कुºहाड व चराई बंदी केली आहे. गावात पुरुष-महिलांचे मिळून ४७ बचत गट असून प्रत्येकास पाणलोट क्षेत्रविकास अंतर्गत २५ हजार रुपये मानधन प्रस्तावित आहे. बारा बलुतेदारांना वैयक्तिक मानधन, गावातील ९३ शेतकऱ्यांना वैयक्तिक मानधन २२.०३ लाख प्रस्तावित आहे. कार्यक्रमात सरपंच धरती देवरे यांच्या सासु मंगला देवरे यांनी हा पुरस्कार स्विकारला होता़