अध्यक्षांकडून ‘सरपंचां’ची खरडपट्टी!

By admin | Published: March 9, 2017 11:42 PM2017-03-09T23:42:35+5:302017-03-09T23:42:35+5:30

जिल्हा परिषद : वैयक्तिक शौचालयांची टक्केवारी कमी असलेल्या ४० गावांच्या पदाधिकाºयांची सुनावणी

'Sarpanchs' slogan from President! | अध्यक्षांकडून ‘सरपंचां’ची खरडपट्टी!

अध्यक्षांकडून ‘सरपंचां’ची खरडपट्टी!

Next

धुळे : वैयक्तिक शौचालयाचे काम समाधानकारक नाही़ सरपंचांचे पद केवळ शोभेचे नाही तर त्याची जबाबदारीसुद्धा सांभाळली पाहिजे़ याकामी जनजागृती करणे आणि ग्रामसेवकांना सोबत घेऊन काम करणे गरजेचे असताना मात्र दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे़ जबाबदारीचे भान सरपंचांनी बाळगायला हवे़ असेच सुरू राहिल्यास अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ वैयक्तिक शौचालयांची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी सुनावणीप्रसंगी व्यक्त केली़
जिल्ह्यातील शौचालयाची टक्केवारी कमी असलेल्या ग्रामसेवकांची सुनावणी घेतल्यानंतर गुरुवारी जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये जिल्ह्यातील ४० गावांतील सरपंचांना सुनावणीसाठी बोलाविण्यात आले होते़ त्यांच्याही गावात शौचालयांची टक्केवारी अगदी बोटावर मोजण्याइतकीच असल्याने त्यांची झाडाझडती घेण्यात आली़ या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे उपस्थित होते़
गेल्या १५ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील चारही तालुकानिहाय ग्रामसेवकांची सुनावणी घेण्यात आली़ अतिशय कमी काम झालेल्या ग्रामसेवकांची खरडपट्टी निघाल्यानंतर आता सरपंचांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अध्यक्ष दहिते यांनी याकामी पुढाकार घेऊन लवकरच त्याबाबत बैठक लावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते़ त्यानुसार सभागृहात सुनावणी घेण्यात आली़
अध्यक्ष दहिते यांनी सांगितले, गावात स्वच्छता राखणे, गाव हगणदरीमुक्त करणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे़ त्याकडे दुर्लक्ष केल्यास सरपंचपद धोक्यात येऊ शकते़
या आनुषंगाने गाव हगणदरीमुक्त करण्याला प्राधान्य देण्यात यावे़ गावात आरोग्यपूर्ण वातावरण राखणे ही जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे़ गाव हगणदरीमुक्त करण्याच्या प्रक्रियेत दुर्लक्ष केल्यास ज्याप्रमाणे ग्रामसेवकांवर कारवाई होऊ शकते, तसे सरपंचांचेसुद्धा पद धोक्यात येऊ शकते़ सर्वांनी हा विषय प्राधान्याने घेऊन गाव हगणदरीमुक्त करावे़ या कामी कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले़
सोनवणे यांनी सांगितले, मार्च २०१८ पर्यंत धुळे जिल्हा हगणदरीमुक्त करायचा आहे़
त्या दृष्टीने जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे़ आगामी काळात उद्दिष्ट गाठण्यासाठी सामूहिक योगदान महत्त्वाचे आहे़ त्यासाठी सरपंचांनीदेखील पुढाकार घेऊन अभियान पुढे नेण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, उपस्थित ४० सरपंचांची ग्रामपंचायतनिहाय सुनावणी घेऊन कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या़ गाव हगणदरीमुक्त करण्यासाठीचे नियोजन याबाबत विचारणा करण्यात आली़
सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावाची सद्य:स्थिती सांगून गावाचे नियोजन सादर करावे़ कामात प्रगती साधावी, अशा प्रकारच्या सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत़

या गावातील सरपंचांचा होता समावेश
धुळे तालुक्यात सडगाव, नवलाणे, बेंद्रेपाडा, खोरदड, चिंचवार, कुंडाणे, पाडळदे, जुन्नेर, लळींग, तांडा कुंडाणे़
साक्री तालुक्यात अलाणे, म्हसदी प्ऱ पिंपळनेर, टेंभे प्ऱ वर्सा, वर्धाने, हट्टी बुद्रुक, हट्टी खुर्द, बुरुडके, घोडदे, जामदे, रुणमळी़
शिरपूर तालुक्यात लाकड्या हनुमान, आंबे, रोहिणी, उमडदे, खमखेडा प्ऱ आंबे, भोईटी, शेमल्या, बोरपाणी, हाडाखेड, बुडके़
शिंदखेडा तालुक्यात सुराय, तावखेडा प्ऱ ब़, वरुळ, वरझडी, तामथरे, शेवाडे, मेथी, रंजाने, जुने कोडदे, तावखेडा प्ऱ ऩ

स्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायतअंतर्गत गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे़ ग्रामसेवकांच्या सुनावणीनंतर आता सरपंचांची सुनावणी घेण्यात आली़ ४० गावांमध्ये समाधानकारक काम झालेले नाही़ त्यामुळे कमी काम असलेल्या ग्रामपंचायतींनी आगामी काळात कामाची गती वाढविण्याची गरज आहे़ गाव हगणदरीमुक्त करावे़                                           - ओमप्रकाश देशमुख

Web Title: 'Sarpanchs' slogan from President!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.