धुळे जिल्ह्यात यंदा जुन्याच गणवेशावर शाळेचा प्रवेशोत्सव
By admin | Published: June 14, 2017 05:54 PM2017-06-14T17:54:48+5:302017-06-14T17:54:48+5:30
गणवेश खरेदीचे अनुदान अद्याप शाळांना प्राप्त झालेले नाही.
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि. 14 - दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्याथ्र्याना सर्वशिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश देण्यात येत असत, यावर्षी मात्र शाळेचा प्रवेशोत्सव जुन्याच गणवेशावर होण्याची चिन्हे आहेत. कारण गणवेश खरेदीचे अनुदान अद्याप शाळांना प्राप्त झालेले नाही.
ग्रामीण भागात अजूनही म्हणावे तसेच शैक्षणिक वातावरण नाही. गोरगरीब, अशिक्षित पालक आपल्या पोटाची खळगी भरण्यातच व्यग्र असतात. रोजंदारी किंवा शेतातील कामे बुडवून त्यांना बँकेत चकारा मारायला वेळ नाही. त्यामुळे नवीन बदल ग्रामीण भागातील विद्याथ्र्याच्या दृष्टीकोनातून योग्य ठरणार नाही. असे शिक्षण क्षेत्रातून बोलले जात आहे.
गणवेशाची रक्कम आई व मुलाच्या संयुक्त खात्यावर जमा करण्यात येणार आहे. परंतु हे खाते खोलतानाही अडचण येत आहे. एकाच पाल्याची एकापेक्षा जास्त मुले असल्यास संयुक्त खाते उघडण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे गरीब विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
सर्वशिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेशासाठी जिल्ह्यात पहिली ते आठवीचे 88 हजार 516 विद्यार्थी पात्र आहेत. यासाठी शिक्षण विभागाने 3 कोटी 54 लाख 6 हजार 400 रुपयाची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
सर्वशिक्षा अभियान अंतर्गत फक्त शासकीय व स्थानीक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमातीची मुले, तसेच दारिद्र्य रेषेखालील सर्व संवर्गातील पालकांची मुले यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येतो.
पालकांना वेळोवेळी सूचना देऊन काही विद्याथ्र्याची अजूनही खातेच उघडले नाहीत. असे शिक्षकांचे म्हणणे आहे. कारण गणवेशासाठी फक्त 400 रुपये अनुदान आणि खाते उघडण्यासाठी किमान 500 रुपये पालकांना खर्च येतो. त्यामुळे खाते उघडण्याबाबत पालकांची अनुउत्सुकता दिसून येत आहे.
या योजनेसाठी विद्याथ्र्याचे नॅशनल, शेडय़ुल्ड, ग्रामीण बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये संयुक्त बँक खाते उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे संयुक्त खाते स्वत: पाल्य व त्याच्या आईच्या नावे उघडावे लागणार आहे.
ज्या लाभाथ्र्याची आई हयात नाही त्यांचे इतर पालक, अभिभावक यांच्या नावे संयुक्त खाते उघडावे लागणार आहे.
इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेशित होणा:या बालकांनाही गणवेशाचे वाटप करण्यात येते. सन 2017-18 मध्ये संभाव्य नव्याने प्रवेशित होणारे गणवेश पात्र लाभाथ्र्याची माहिती असल्यास त्यांचे बँक खाते उघडण्याबाबत सूचना पालकांना देण्यात याव्यात. इयत्ता पहिलीच्या वर्गात नव्याने दाखल होणा:या लाभार्थी विद्याथ्र्याचा निधी व शाळेत नव्याने प्रवेश घेतलेले निकष पात्र लाभार्थी विद्याथ्र्याचा निधी शाळा सुरू झाल्यापासून एक महिन्याच्या आत राखे स्वरूपात स्वत: बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
यावर्षी गणवेश खरेदीच्या नियमात बदल करण्यात आला आहे. पालकांनी गणवेश खरेदीची पावती दाखविल्यानंतर अनुदान पाल्याच्या खात्यावर वर्ग होणार आहे. गणवेश खरेदीचे अनुदान शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर लवकरच वर्ग करण्यात येणार आहे. तोर्पयत पालकांना गणवेश खरेदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- मोहन देसले, प्राथमिक शिक्षणाधिकारी
गणवेश खरेदीचे अनुदान अद्याप शाळांना प्राप्त झालेले नाही. तसेच गणवेश खरेदी केल्यानंतर पालकांना गणवेशाची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे गरीब पालक गणवेश खरेदी करू शकत नाहीत. तसेच शाळेलाही गणवेश खरेदीचे अधिकार नाहीत. यामुळे गरीब विद्याथ्र्याचे नुकसान होणार आहे.
-राजेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समिती