मनपाच्या शाळेत वीज आहे, मात्र पंखेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:11 PM2019-04-27T23:11:17+5:302019-04-27T23:11:35+5:30

शौचालयाची दुरवस्था, वापरासाठी पाण्याची सोय नाही; कचऱ्याचेही साचले ढीग

School has electricity, but there is no fan | मनपाच्या शाळेत वीज आहे, मात्र पंखेच नाहीत

dhule

Next

धुळे : मतदान केंद्र असलेल्या बहुतांश शाळांमध्ये अस्वच्छतेचा कळस गाठला असून शौचालयांची दुरवस्था आहे. तेथे वापरासाठी पाणीच नाही. खोल्यांमध्ये पंखेही नाहीत. त्यामुळे तळपत्या उन्हात घामाच्या धारांमध्ये कर्मचाऱ्यांना काम करावे लागणार आहे. शहरातील मतदान केंद्राची स्थितीबाबत ‘लोकमत’ ने शनिवारी पाहणी केली़ यात अनेक ठिकाणी समस्याच समस्या दिसून आल्या.
लोकसभा निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील धुळे लोकसभा मतदार संघात मतदान घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची पाहणी केली. त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाºयांना व मतदारांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी मतदान केंद्र सर्व सुविधांनी सज्ज ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. महापालिकेच्या शाळासह इतर खासगी शाळांमधील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर दुर्दशा दिसून आली. केंद्राकडे जाण्या-येण्याचा रस्ता नीट-नेटका असला तरी केंद्रामधील अस्वच्छता मात्र निवडणूक कर्मचारी व मतदारांना त्रासदायक ठरणारी दिसून आली. विशेष म्हणजे काही ठिकाणी शौचालय आहे, पण त्या ठिकाणी पाणी नसल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला.
मनपा उर्दु शाळांची दुरावस्था महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्या मतदान केंद्रावरही कचºयाचे ढीग तसेच शौचालयातही दुर्गंधी झालेली दिसून आली. त्यात भंगार बाजार व मनपा उर्र्दु शाळा क्रं २० मध्ये बाथरुम बंद पडलेला असुन परिसरात दुर्गंधी येत होती. तर परिसरात मोकाट जनावरांनी परिसर अस्वच्छ केलेला होता़

Web Title: School has electricity, but there is no fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे