कापडणे येथे वर्गखोल्यांअभावी समाजमंदिरात शाळा
By admin | Published: June 16, 2017 03:43 PM2017-06-16T15:43:36+5:302017-06-16T15:43:36+5:30
चार वर्षापासून जि.प. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; पालकांची व्यक्त केली नाराजी
Next
दीपक पाटील / ऑनलाईन लोकमत
कापडणे,दि.16 - धुळे तालुक्यातील कापडणे येथील खोखरहाट्टी परिसरातील जि.प. शाळा क्रमांक पाचची स्वतंत्र इमारत नाही. त्यामुळे इयत्ता पहिले ते चौथीचे वर्ग चक्क गावातील समाजमंदिरातील एका खोलीत भरतात. विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षापासून अशी परिस्थिती असताना त्याकडे जि.प. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शिक्षण सभापतींचे गाव
धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती नूतन शेखर पाटील या कापडणे गावातील रहिवाशी आहेत. तरीही त्यांच्या गावातील जि.प. शाळेसाठी स्वतंत्र इमारत नाही. एकीकडे जि.प. प्रशासनातर्फे डिजीटल शाळेचा बोलबोला केला जात आहे. मात्र, कापडणे गावातील जि.प. शाळा क्रमांक पाचच्या विद्याथ्र्याना चक्क समाजमंदिरातील एका खोलीत बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.
निधी प्राप्त नसल्याने रखडले काम
कापडणे गावात एकूण जि.प.च्या पाच शाळा आहेत. भात नदीच्या पलीकडील किना:यालगत आदिवासी बहुल भागातील खोखरहाट्टी भागात जि.प. शाळा क्रमांक 5 आहे. ही शाळा 2013 पासून सुरू झाली. त्यानंतर या शाळेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक, दोन वर्गखोल्या, शिक्षक दालन मंजूर करण्यात आले. परंतु, त्यासाठी लागणारा पाठपुरावा न झाल्यामुळे अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. परिणामी, शाळेच्या इमारतीचे व वर्गखोल्यांचे काम रखडलेले आहे.
दोन शिक्षकांवर मदार
सद्य:स्थितीत येथील शाळेत विद्याथ्र्याना शिक्षण देण्यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती आहे. त्यांना तब्बल इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग शिकवावे लागतात. विशेष, म्हणजे या समाजमंदिरात आदिवासी बांधवांचे छोटे मंदिर आहे. त्यातील एका खोलीत शाळा सुरू असते. त्यामुळे मंदिरात भाविकांची वर्दळ असल्यामुळे विद्याथ्र्याच्या अभ्यासात व्यत्यय येत असल्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विद्याथ्र्याचा शैक्षणिक विकास खुंटला
एकाच वर्गात बसून इयत्ता पहिले ते चौथीच्या विद्याथ्र्याना शिकविले जात असल्यामुळे अनेक विद्याथ्र्याना शाळेत शिकविला जाणारा अभ्यास लक्षात राहत नाही. परिणामी, विद्याथ्र्याचा शैक्षणिक विकास खुंटला आहे. परिणामी, पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळेसाठी त्वरित स्वतंत्र इमारत व शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.