शाळांना ‘आयएसओ’ मानांकनाचा मिळाला दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:56 PM2019-09-14T22:56:32+5:302019-09-14T23:10:56+5:30

शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी -महेंद्र जोशी

Schools receive 'ISO' rating | शाळांना ‘आयएसओ’ मानांकनाचा मिळाला दर्जा

dhule

Next
ठळक मुद्देडिजीटल शाळेसह विज्ञानावर भरदुरूस्तीसाठी १ कोटींची तरतूदसमन्वयातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नसकस गरम जेवण बंद डब्यात मिळणार

चंद्रकांत सोनार ।

धुळे : महापालिका शिक्षण मंडळांतर्गत मराठी व उर्दू माध्यमाच्या २० शाळा आहेत़ त्यातील शाळा क्रमांक ५३, २०,२५,९, ८ व ५६ या डिजीटल झाल्या असून त्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ त्यातील शाळा क्रमांक २० ही १०० टक्के लोकसहभागातून डिजीटल करण्यात आली आहे़ याच शाळेला शासनातर्फे आयएसओ-२००९ मानाकंनाचा दर्जा मिळाला आहे़ अशी माहिती महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली
प्रश्न: मनपाच्या किती शाळांमध्ये इंग्रजी विषय शिकविला जातो?
उत्तर: विद्यार्थ्यांचा इंग्रजी शिक्षणाचा पाया पक्का होण्यासाठी राज्य शासनाने धुळे मनपाच्या शाळांचा नुकताच समावेश केला आहे़ त्यानुसार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जा देणाऱ्या तेजस या उपक्रमातून मराठी व उर्दु शाळांमध्ये इंग्रजी विषय शिकविला जात आहे़ या उपक्रमात शिक्षकांनाही इंग्रजी बोलता, लिहिता आणि वाचण्याचा सराव केला जात आहे़ शिक्षकांची इंग्रजी दर्जेदार झाल्यास त्यांचा फायदा विद्यार्थ्यांना होईल़
प्रश्न: मनपा शाळांची गुणवत्ता वाढीसाठी काय प्रयत्न केला जात आहे ?
उत्तर: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण २००९ नुसार शाळांमध्ये कार्यवाही केली जात आहे़ अध्यापनाच्या बाबतीत कृती सत्र व प्रत्यक्ष शैक्षणिक साधनांचा वापर शासनाने दिलेल्या गणित पेटी, विज्ञान पेटी, इंग्रजी पेटी यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केला जात आहे़ त्यामुळे शाळांची पटसंख्या सर्वाधिक आहे़
प्रश्न: पोषण आहाराच्या तक्रारीवर काही निर्णय घेतला जाणार आहे का ?
उत्तर: मुंबई, कोल्हापूर महापालिकेच्या धर्तीवर आता धुळ्यात सेंट्रल किचनचा अनोखा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यासाठी खाजगी संस्था किंवा बचत गटाकडे शालेय पोषण आहार निर्मितीची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे़ त्यामुळे येणाºया काळात मनपात शिक्षण घेणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला सकस गरम जेवण बंद डब्यात मिळणार आहे़ त्यामुळे पालकांना भविष्यात पोषण आहाराविषयी तक्रारी करण्याचा प्रश्न येणार नाही़
डिजीटल शाळेसह विज्ञानावर भर
मनपाच्या मराठी ८ तर उर्दू माध्यमाच्या १२ अशा एकूण २० शाळांमध्ये २ हजार ४६१ विद्यार्थी शिक्षण घेत आहे़ शाळांची स्थिती जरी समाधानकारक नसली तरी गुणवत्ता व पटसंख्या आजही टिकून आहे़ मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमाप्रमाणे डिजीटल शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते़ शासनाने चार शाळांना विज्ञान केंद्र मंजूर केल्याने प्रत्यक्ष प्रयोगातून अध्ययन व अध्यापनाची संधी मिळत आहे़
दुरूस्तीसाठी १ कोटींची तरतूद
ब्रिटीशकालिन शाळांच्या इमारतींची रंगरंगोटी, छत दुरूस्ती, पाण्याची टाकी, दरवाजे, खिडक्या दुरूस्ती, वर्गखोल्यांवर फायबर पत्रे, स्वच्छतागृहे व शौचालये यांची दुरूस्ती, फळ्याची निर्मिती, वर्गखोल्यांच्या फरशांची दुरूस्तीसाठी शिक्षण विभागाने मनपाकडे यंदाच्या अर्थसंकल्पात इमारतींच्या विशेष दुरुस्तीसाठी १ कोटी रुपयांची तरतुदीची मागणी केली आहे़



 

Web Title: Schools receive 'ISO' rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे