विज्ञान प्रदर्शनात ४५ उपकरणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 09:40 PM2019-12-29T21:40:16+5:302019-12-29T21:40:45+5:30

दोंडाईचा : कृषी, वीज निर्मिती, शाश्वत ऊर्जा व आरोग्यावर उपकरणे

 The science exhibition includes 3 devices | विज्ञान प्रदर्शनात ४५ उपकरणांचा समावेश

Dhule

googlenewsNext

दोंडाईचा : येथील आर.डी.एम.पी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनात पाचवी व विज्ञान शाखेतील बारावीच्या विद्यार्थ्यांनी कृषी, आरोग्य अशा विविध विषयांवर ४५ उपकरणे सादर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.एन. जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय स्कूल कमिटी सदस्या छायाबाई प्रवीण तिरमले, उपमुख्याध्यापक बी.एन. गिरासे व पर्यवेक्षक आर.डी. चव्हाण, ज्युनियर विभाग प्रमुख एस.आर. भावसार उपस्थित होते.
प्रदर्शनात कृषी, वीज निर्मिती, शाश्वत ऊर्जा, आरोग्य व गणिती विषयावर आधारित ४५ उपकरणे मांडण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख मान्यवरांनी उपकरणाची माहिती जाणून घेतली.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक डी.एन. जाधव म्हणाले की, विद्यार्थ्यांना विज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी म्हणून शालेय पातळीवर प्रदर्शन भरविले जाते. घरातील स्वयंपाकगृहापासून विज्ञान सुरू होते. आपल्या सभोवताली असणाऱ्या बदलात विज्ञान दिसते. जिज्ञासा वृत्तीतून विज्ञानाची महती समजते. शालेयस्तरावर विज्ञानाबाबत अभिरुची वाढावी म्हणून सदर प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. बालवैज्ञानिकांनी अतिशय उत्कृष्ट उपकरणे सादर केली असून भविष्यात यातूनच वैज्ञानिक घडणार आहेत, अशी अपेक्षा आहे.
परीक्षक म्हणून आर.आर. पवार, डी.डी. गिरासे, डी.के. सोनवणे यांनी काम पाहिले.
विज्ञान प्रदर्शनचे सूत्रसंचालन के.पी. गिरासे यांनी केले. कलाशिक्षक राजन मोरे यांनी फलक लेखन केले. आभार प्रदर्शन जे.एच. गिरासे यांनी केले. विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक, उपशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Web Title:  The science exhibition includes 3 devices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे