हस्ती स्कूलच्या ५२ विद्यार्थ्यांना स्काऊट राज्य पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:54+5:302021-05-29T04:26:54+5:30
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाइड संस्थेतर्फे २ ते ५ मार्च २०२१ दरम्यान हस्ती पब्लिक स्कूल, दाऊळ शिवार ...
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाइड संस्थेतर्फे २ ते ५ मार्च २०२१ दरम्यान हस्ती पब्लिक स्कूल, दाऊळ शिवार कँपस् दोंडाईचा येथे कोविड-19 च्या नियमांचे पालन करीत ही परीक्षा झाली. तिचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या सर्व पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व बँज प्राप्त होणार आहे.
शाळेतील प्रसन्न अहिरराव, यश बागल, कृष्णा बाविस्कर, आरुष भामरे, विराज गिरासे, देवेश माळी, व्यंकटेश माळी, हर्षल पाटील, निखिल पाटील, निरंजन पाटील, लक्ष पवार, स्वामी शहा, धीरज ठाकरे, यश वाणी, आर्यन भावसार, प्रेमसिंग गिरासे, पीयूष गुजराथी, प्रेमराज पाटील, वेद पाटील, यश पाटील, भावेश पटेल, निखिल पवार, सिद्धेश सदाराव, आयुष शिनकर, मोनीष शिंत्रे, सक्षम उपाध्ये, अमय भावसार, तनुष भावसार, कृष्ण चित्ते, राजेंद्र गिरासे, तन्मय गिरासे, तुषार गिरासे, कलश जैन, देवांत खैरनार, वैष्णव खैरनार, सुमित महाजन, मोक्षित पाटील, नितीन पाटील, दर्शन परदेशी, ऋषिकेश पवार, पृथ्वी राजपूत, खुषण रूपचंदाणी, रोहन गुजराथी, आगम जैन, वैभव जैन, रोशन विजयकुमार, ईशान माहेश्वरी, अमेय मालपूरकर, कार्तिक निकम, चिन्मय पाटील, आदित्य शिंदे व वीरेंद्र चव्हाण.
वरील स्काऊटस् विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार परीक्षा उत्तीर्ण झाले.
परीक्षा यशस्वी होण्यासाठी संतोष सोनवणे, जिल्हा स्काऊट आयुक्त, गणेश फुलपगारे, जिल्हा स्काऊट प्रशिक्षण आयुक्त व हस्ती स्कूल स्काऊट गाइड विभाग प्रमुख किशोर गुरव तसेच स्काऊट मास्टर प्रवीण गुरव, नरेश सावंत, मनोहर यादव यांचे मार्गदर्शन लाभले. तर स्थानिक शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी, हस्ती स्कूल शालेय समिती चेअरमन कैलास जैन, तसेच प्राचार्य हरिकृष्ण निगम यांनी कौतुक केले.
हस्ती स्कूल येथे दरवर्षी नियमितपणे स्काऊट गाइड चळवळींतर्गत अशा स्वरूपाचे पुरस्कार शिबिर व विविध उपक्रम यांचे आयोजन केले जाते. याद्वारा विद्यार्थ्यांवर स्वयंशिस्त, स्वावलंबन, शील संवर्धन, आरोग्य, व्यवसाय व सेवा गुणांचे मूल्य संस्कार रुजविले जातात.
Attachments area