घरकूल लाभार्थ्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:04 PM2019-02-21T23:04:13+5:302019-02-21T23:05:16+5:30
महापालिका : २२६ लाभार्थी अनुदानातून वंचित
धुळे : रमाई आवास घरकुल योजनेतील अनुदानाचा पहिला हप्ता अद्याप मिळालेला नाही. दरम्यान तत्काळ हप्ता वर्ग करावा यामागणीसाठी दोनदिवसापासून वाल्मीक दामोदर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
रमाई घरकुल योजनेत ३६६ लाभार्थ्यांना मंजुरी दिली आहे. रमाई आवास घरकुल योजना समितीचे अध्यक्ष सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या सभेत ही मान्यता देण्यात आली. या पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम अनुदानाचा पहिला हप्ता मिळालेला नाही. यासाठी क्युमाईन क्लबजवळ धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनात राहुल दुर्धळे, गणेश रणधीर,कैलास महाले, आनन देवरे, सजन मोरे,भारत तापसे, प्रभाकरराव खंडारे,विजय अहिरे,राजू गजरे, सत्यभामा करडक, सुमन वाघ, रत्ना दामोदर,अशोक शिरसाठ, अतुल दामोदर, विमल थोटे,अभिवसन अहीरे, अविनाश वाघ, विनोद केदार, विनोद थोटे,विशाल शिंदे उपस्थित होते.