राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:14 PM2019-09-07T12:14:47+5:302019-09-07T12:15:25+5:30

साक्री : सी.गो. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश

Second in the state level quiz competition | राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय

मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक स्वीकारतांना विद्यार्थी.

googlenewsNext


साक्री : येथील सी.गो. पाटील महाविद्यालयाच्या चाणक्य मंडळ विभागातील विद्यार्थांनी पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. 
अमळनेर येथील खा.शि. मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय येथे ५ व ६ सप्टेंबर दरम्यान पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सी.गो. पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी पुनमचंद ज्ञानेश्वर नवसारे व दिनेश रामदास खैरनार यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना पारितोषिक रोख रक्कम ५ रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.  प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील, चाणक्य मंडळाचे समन्वयक प्रा.एस.आर. गोवर्धने आदींनी यशस्वीतांचा गौरव केला.

Web Title: Second in the state level quiz competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे