स्वनिधी योजना नोंदणीत राज्यात दुसरा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 01:38 PM2020-08-01T13:38:20+5:302020-08-01T13:39:06+5:30
मनपा : पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी ६८६ आॅनलाईन अर्ज
धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान स्वनिधी योजना राबवण्यात येत आहे. मनपाकडून फेरीवाले व व्यवसायिकांना आॅनलाइन नोंदणीसाठी आवाहन केले होते़ स्वनिधी योजनेच्या नोंदणीत धुळे महापालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे़
आत्मनिर्भर भारत संकल्पनेंतर्गत शहर हद्दीतील नगर पथविक्रेत्यांना कर्ज स्वरूपात आर्थिक साहाय्य देऊन अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी प्रयत्न होत आहे. नगरपथ विक्रेते नागरी अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे घटक आहे. नागरिकांना त्यांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे कमी दरात वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. कोरोना व लॉकडाऊनमुळे पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे. त्यांना खेळते भांडवल देण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीतून योजना राबवली जात आहे. मनपा क्षेत्रातही या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेच्या कामाचा प्रधान सचिव महेश पाठक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. योजनेच्या लाभासाठी आॅनलॉइन अर्ज भरावा
६८६ अर्ज आॅनलाइन प्राप्त
यासाठी शहरातून पथविक्रेत्यांचे ६८६ अर्ज आॅनलाइन प्राप्त झाले आहे. योजनेच्या कामात राज्यात धुळे महापालिका दुस?्या स्थानी असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. शहर हद्दीतील पथविक्रेत्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज भरावे, असे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, ाभापती स्नेहल जाधव, उपसभापती रेखा सोनवणे, कांतिलाल दाळवाले, साबीर शेख, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी आदींनी केले आहे.