लायन्स क्लबच्या पदाधिका-यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 10:57 PM2019-03-22T22:57:21+5:302019-03-22T23:05:07+5:30

प्रांत ३२३४ एच २ : प्रांतपाल नितीन बंग यांच्याकडून नावे जाहीर

Selection of Lions Club Executives | लायन्स क्लबच्या पदाधिका-यांची निवड

लायन्स क्लबच्या पदाधिका-यांची निवड

Next
ठळक मुद्देप्रांतपाल नितीन बंग यांच्याकडून पदाधिका-यांची निवड जाहीर राज्यातील विविध १३ जिल्ह्यांतील पदाधिका-यांचा समावेश राष्ट्रभक्ती आधार ठेवून वर्षभर विविध कार्यक्रम राबविणार 

लोकमत आॅनलाईन
धुळे : लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या प्रांत ३२३४ एच २ च्या प्रांतपाल पदी धुळ्याचे नितीन बंग यांची इंदूर येथील प्रांतीय अधिवेशनात निवड केल्यानंतर त्यांनी आपल्या प्रमुख पदाधिका-यांची निवड केली़ दरम्यान, राष्ट्रभक्ती हा आधार ठेवून वर्षभर कार्य करण्याचे बंग यांनी यावेळी जाहीर केले़ 
राज्यातील खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग असे मिळून १३ जिल्ह्यांचा मिळून तयार झालेल्या लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या प्रांत ३२३४ एच २ च्या प्रांतपाल पदाची निवड करण्यात आल्यानंतर नूतन पदाधिका-यांची निवड करण्यात आली़ 
त्यानुसार, प्रांत सचिवपदी प्रदीप सोनवणे (धुळे), प्रांत कोषाध्यक्षपदी सिध्दार्थ गिंदोडीया (धुळे), जीएसटीपदी पुरुषोत्तम जयपुरीया (जालना), जीएमटीपदी दिपा रिझवानी (परभणी), जीएलटीपदी गिरीष सिसोदिया (जळगाव), पीआरओपदी सुनील लाहोटी (जालना), मेरा लायन संपादकपदी पारस ओस्तवाल (औरंगाबाद), रिजन एकच्या रिजन चेअरमनपदी डॉ़ तेजल चौधरी (नंदूरबार), रिजन दोनच्या रिजन चेअरमनपदी प्रकाश मुंदडा (खामगाव), रिजन तीनच्या रिजन चेअरमनपदी रश्मी नायर (औरंगाबाद),  रिजन चारच्या रिजन चेअरमनपदी डॉ़ हिमांशू गुप्ता (औरंगाबाद), रिजन पाचच्या रिजन चेअरमनपदी मनोहर खलापुरे (परतूर), रिजन सहाच्या रिजन चेअरमनपदी गंगाप्रसाद तोष्णीवाल (नांदेड), रिजन सातच्या रिजन चेअरमनपदी संजय सारडा (नांदेड) यांची निवड करण्यात आली                आहे़ 
तसेच उपप्रांतपालपदी विवेक अभ्यंकर (औरंगाबाद), दिलीप मोदी (नांदेड) यांचीही निवड करण्यात आली़ 
इंदूर येथे पार पडलेल्या अधिवेशनात माजी प्रांतपाल जयेश ठक्कर (नांदेड), कमलमान सिंघका (उदगीर), राजेश राऊत (औरंगाबाद), डॉ़रविंद्र कुलकर्णी (अमळनेर), महावीर पाटणी (औरंगाबाद), विजय बगडिया (जालना), डॉ़ अशोक बावस्कर (खामगाव), डॉ़ मन्मथ भातांब्रे (लातूर), तनसुख झांबड (औरंगाबाद), सतिष चरखा (जळगाव), नारायणलाल कलंत्री (नांदेड), रमाकांत खेतान (अकोला), प्रेमचंद रायसोनी (जळगाव) यांच्यासह इंदूर येथील प्रांतपाल कमलेश जैन, उपप्रांतपाल अजय सेंगर (नागपूर),  नागपूर येथील प्रांत ३२३४ एच १ चे प्रांतपाल सुनील वोरा (यवतमाळ) यांची यावेळी उपस्थिती होती़ अधिवेशनाचे औचित्य साधून विविध पुरस्कार यावेळी देण्यात  आले़ 

 

Web Title: Selection of Lions Club Executives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे