रोलर स्केटींग स्पर्धेत ७ खेळाडूंची विभागावर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 03:19 PM2018-11-27T15:19:13+5:302018-11-27T15:20:01+5:30
स्पर्धेत ११, १४, १७ व १९ वर्षाखालील मुले-मुली सहभागी
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित धुळे येथील एस.व्ही.के.एम. सीबीएसई स्कूलच्या ७ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय रोलर स्केटींग स्पर्धेत घवघवीत यश मिळविले़ त्यांची निवड विभागीय स्पर्धेकरीता करण्यात आलेली आहे़
नुकत्याच जिल्हास्तरीय रोलर स्केटींग स्पर्धा झाल्यात़ या स्पर्धेत ११, १४, १७ व १९ वर्षाखालील मुले-मुली सहभागी झाले होते. स्पर्धेत ११ वर्षे वयोगटात (इनलाइन) मध्ये ग्यान मंत्री हा विद्यार्थी द्वितीय क्रमांकाने व रोलर स्केटिंग मुलींमध्ये ग्रीषा अग्रवाल द्वितीय तर आशना बाफना हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच १४ वर्ष वयोगटात (इनलाइन) अमेय हिरे याने प्रथम क्रमांक व मुलींमध्ये कस्तुरी देवरे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला़ १४ वर्ष वयोगटात रोलर स्केटिंगमध्ये जिवेश सैदाणे याने तृतीय क्रमांक, १४ वर्षे मुलींमध्ये पूर्वा देशमुख तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी खेळाडूंचे एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, मुख्याध्यापिका सुनंदा मेनन यांनी कौतुक केले. याकामी क्रीडा शिक्षक रतिलाल पाडवी यांचे मार्गदर्शन लाभले.