ज्येष्ठ साहित्यिक मु. ब. शहा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 03:21 PM2017-10-08T15:21:12+5:302017-10-08T15:22:40+5:30

साहित्य क्षेत्रात पोकळी : शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Senior literary issues B. Shah died | ज्येष्ठ साहित्यिक मु. ब. शहा यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक मु. ब. शहा यांचे निधन

Next
ठळक मुद्देअंत्यसंस्काराप्रसंगी साहित्यिकांच्या डोळ्यात तरळले अश्रूमुलीने दिला अग्नीडाग.विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  :  थोर विचारवंत तथा प्रसिद्ध साहित्यिक डॉ. मुरलीधर बन्सीलाल शहा  (७८) यांचे रविवारी पहाटे साडेचार वाजता निधन झाले. त्यांच्यावर देवपुरातील अमरधाम येथे दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 
गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. परंतु, त्यांचे पहाटे निधन झाले. डॉ. शहा यांनी हिंदी, साहित्य, राष्टÑभाषा प्रचार, राष्टÑसेवादल समाजवादी चळवळी, छात्रभारती, नर्मदा बचाव, महात्मा गांधी तत्वज्ञान संस्था, साने गुरुजी कथामाला, सांस्कृतिक चळवळ, आनंदवन  व विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा ठसा उमटविला होता. 
त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिकांची उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री, मुलगा सौमित्र, मुली रूचा पारीक, प्रज्ञा मनीष शाह व नातवंडे असा परिवार आहे. 

Web Title: Senior literary issues B. Shah died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.