पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या २७ जणांवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 09:28 PM2020-04-25T21:28:24+5:302020-04-25T21:28:45+5:30

खुनाचा प्रयत्न । पोलिसांच्या अंगावर सोडला कुत्रा

Serious crime against 27 people for throwing stones at police | पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या २७ जणांवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा

पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या २७ जणांवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील सुरत बायपास हायवे जवळ चक्करबर्डी परिसरात गावठी दारुच्या गुत्त्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी २७ संशयितांविरुध्द गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
त्यात लखन अरविंद चौगुले, ज्योती लखन चौगुले, लक्ष्मीबाई अरविंद चौगुले, अनिल बापु तागडकर, विनोद बापु तागडकर, सुनील बापु तागडकर, अशोक तागडकर, ताईबाई बापु तागडकर, अंबादास बाळु लष्कर, शेरा कुसळकर, सुरेश मंजुळकर, मिराबाई मंजुळकर, गणेश मंजुळकर, ईश्वर वेताळ, ज्योती वेताळ, अनिल वेताळ, परमेश्वर देवकर या १७ जणांसह इतर आठ ते दहा अशा २७ संशयितांचा समावेश आहे़ त्यांच्याविरुध्द पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता भादंवि कलम ३०७, ३५३, ३३२, ३३३, २७९, १४३, १४७, १४९, १८८ सह महाराष्ट्र प्रोव्ही़ का़ क़ ६५ (ब) (क) (इ) (फ) ८३ आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१, ५२, ५४ प्रमाणे संचारबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणे, विनापरवाना दारु विक्री करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिस कर्मचाºयाचा खून करण्याचा प्रयत्न करणे, दंगल माजविणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत़ शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी संदीप जगन्नाथ पाटील (४०) यांनी फिर्याद दिली आहे़ गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक डी़ पी़ पाटील करीत आहेत़
या संशयितांनी पोलिसांवर विटा आणि दगडांचा मारा करुन प्राणघातक हल्ला केला़ पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले़ लाकडी दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले़ या हल्ल्यात संदीप पाटील आणि सुनील वामन पाठक हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

Web Title: Serious crime against 27 people for throwing stones at police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे