शिस्तीसाठी धुळ्य़ाच्या सीईओंचा ‘गंभीर’ इशारा
By admin | Published: May 20, 2017 05:11 PM2017-05-20T17:11:05+5:302017-05-20T17:11:05+5:30
लाभाथ्र्याना पहिला हप्ता देवूनही काम सुरू न करणा:यांवर कारवाई करण्याचा इशारा
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 20 - इंदिरा आवास योजनेतील घरकुलासंदर्भात लाभाथ्र्याना पहिला हप्ता देवूनही काम सुरू न करणा:यांवर कारवाई करण्याचा इशारा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवरंजन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़ दरम्यान, कर्मचा:यांच्या कार्यपध्दतीवर या पुढील काळात लक्ष दिले जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिल़े
मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवरंजन यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला़ ते म्हणाले, आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसलेल्या नागरिकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आह़े त्यासाठी पहिला हप्ताही शासनाकडून देण्यात आलेला आह़े निधी मिळून देखील काम सुरू न करणा:यांची माहिती संकलित केली जात आह़े नोटीस देवूनही उपयोग होत नसल्याने त्यांच्या गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येईल़ ज्यांनी काम सुरू केले आहे, पण निधी अभावी काम थांबले असेल त्यांना निधी मिळवून देण्यासाठी शासनकडे पाठपुरावा केला जाईल़
जिल्हा परिषद आणि चारही पंचायती यातील अंतर्गत रचनेची दुरुस्ती करण्यात येईल़ जिल्हा परिषदेत येणा:या नागरिकांची गर्दी लक्षात घेता, पार्किगची शिस्त लावण्यात येईल़ कोणी कुठे वाहनाची पार्किग करावी हे सांगितले जाईल़ लोकप्रतिनिधी असो वा अधिकारी, कर्मचारी या सर्वाचा समावेश असेल़
कर्मचा:यांसाठी बायोमेट्रीक हजेरी सुरु केली जाईल़ त्यात दोनवेळा हजेरी लावणे बंधनकारक असणार आह़े कर्मचारी मुख्यालयात बहुतेक वेळा राहत नाही, कधी कोणालाही न सांगता परस्पर निघून जातात अशा कर्मचा:यांवर माङो लक्ष राहणार आह़े त्यांनी आपले मुख्यालयात कार्यालयीन वेळेत सोडता कामा नय़े असे केल्यास आणि माङया तपासणीत आढळल्यास अशांवर निश्चितच कारवाई होईल, असे संकेतही त्यांनी दिल़े
यामागील काळात काय झाले, याच्याशी मला काहीही घेणे-देणे नाही़ यापुढील काळात सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख या नात्याने माझी राहणार आह़े कोणत्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेतले जाणार नाही़ जे काही निर्णय होतील त्याची जबाबदारी शेवटी माझी राहील़ न्याय देण्याची भूमिका राहील, कर्मचा:यांनी शिस्तीचे पालन कराव़े, असेही त्यांनी स्पष्ट केले.