धुळे जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या सात जणांना पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By अतुल जोशी | Published: September 9, 2023 05:26 PM2023-09-09T17:26:42+5:302023-09-09T17:26:54+5:30
देवपूरसह दहिवेल (ता. साक्री) येथे घरफोडी, तसेच दुचाकी, चारचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
धुळे: देवपूरसह दहिवेल (ता. साक्री) येथे घरफोडी, तसेच दुचाकी, चारचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणून सात जणांना अटक केली. संशयित आरोपींजवळून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने दुचाकी, चारचाकी असा एकूण ४ लाख १८ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
देवपुरातील पद्मश्री अपार्टमेटमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी अट्टल गुन्हेगार सऊद सलीम अन्सारी(वय२३, धुळे) याच्यासह इम्रान शेख रफीक (वय २३, रा. मालेगाव, नाशिक), हेमंत किरण मराठे (वय २८,,धुळे) व अमोल रामदिन परदेशी (वय ३७, रा. धुळे) यांना ताब्यात घेतले. संशयित आरोपींजवळून सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम असा ३० हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पोलिसांनी दोन दुचाकी जप्त केल्या.
तर साक्री तालुक्यातील दहिवेल येथे झालेल्या चोरी प्रकरणीपप्पू बम उर्फ शाकीर शहा इम्राहिम शहा (वय ३३, धुळे), मारी उर्फ इस्माईल नजीर शेख (वय २०, धुळे), तौसिफ कपाशी उर्फ तौसिफ शहा अजीज शहा (वय ३२, धुळे), यांना अटक केली. पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली कार (क्र. एमएच ०३- एएफ०४९८) पोलिसांनी जप्त केली.