साक्री पोलिसांकडून गावठी दारु जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 09:55 PM2018-11-29T21:55:45+5:302018-11-29T21:56:42+5:30
चारचाकीचा सिनेस्टाईल पाठलाग : एकास अटक, एक फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : मोरकरंजा येथून गावठी दारू घेऊन जाणाºया चार चाकी वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून साक्री पोलिसांनी दीडशे लिटर गावठी दारू जप्त केली असून वाहतूक करणारीे गाडी ताब्यात घेतली. या घटनेतील एका आरोपीला पोलिसांना पकडण्यात यश आले असून दुसरा आरोपी फरार झाला आहे. त्यांच्याविरोधात साक्री पोलिसात भादवि कलम २७९, १८४ मुंबई दारूबंदी कायदा कलम ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जिल्हा ग्रामीण पोलीस उपाधीक्षक श्रीकांत घुमरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गाडी क्रमांक एम एच ०४ सीटी ६६५० यातून गावठी दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. सदर गाडी ही दहिवेलकडून पिंपळनेर रस्त्याला जात असताना ती अचानक मालपुर कासारेकडे वळली. त्यांनी ही गाडी मालपुर गावात गल्लीबोळातून गाडी जात असताना गाडीला पुढे जायला रस्ता न मिळाल्याने आरोपींनी गाडी थांबवली. यावेळेस एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. गाडीतील अरविंद वनसिंग गावित पोलिसांना मिळून आला. तर सुरेश रमेश गावित दोन्ही राहणार मोरकरंजा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत दारु आढळून आली. याची किंमत साडेसात हजार रुपये तर एक लाख रुपये किमतीची चार चाकी गाडी पोलीसांनी जमा केली आहे. यावेळेस पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे पोलीस निरीक्षक देविदास डुमणे यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.