शिरपूर तालुक्यात अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या पायविहीरींची दुरवस्था

By Admin | Published: May 11, 2017 04:30 PM2017-05-11T16:30:10+5:302017-05-11T16:30:10+5:30

पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांच्या अधिपत्याखाली शिरपूर तालुक्याचा परिसर असतांना त्यांनी लोकहिताची व कल्याणाची जी कामे केलीत त्याच्या पाऊल खुणा याही तालुक्यात उमटलेल्या आहेत़

The shadow of the footpath built by Ahilyadevi Holkar in Shirpur taluka | शिरपूर तालुक्यात अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या पायविहीरींची दुरवस्था

शिरपूर तालुक्यात अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या पायविहीरींची दुरवस्था

googlenewsNext

 ऑनलाईन लोकमत विशेष /सुनील साळुंखे  

शिरपूर, जि.धुळे, दि.11 - पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांच्या अधिपत्याखाली शिरपूर तालुक्याचा परिसर असतांना त्यांनी लोकहिताची व कल्याणाची जी कामे केलीत त्याच्या पाऊल खुणा याही तालुक्यात उमटलेल्या आहेत़ त्या काळातील आजही पायविहिरी असून त्याकाळी पाण्याचा स्त्रोत म्हणून वापर केला जात होता, परंतु सध्या त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पायविहिरींची दुरवस्था झालेली दिसत़े  
शिरपूर- शहरातील पाताळेश्वर मंदिरासमोर पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली पायविहीर  बुजवून टाकण्यात आली होती़ गेल्यावर्षीच धनगर समाजातील लोकांनी विहिरीच्या पाय:या मोकळ्या केल्यात़ याच विहिरीद्वारे कधीकाळी पाणी पुरवठा केला जात होता़ इंग्रजी ‘एल’ आकारात ही विहीर बांधण्यात आली आह़े   ह्याच पायविहिरीच्या हाकेच्या अंतरावर दुसरी पायविहीर म़गांधी मार्केटच्या शॉपींग सेंटरमध्ये आह़े गेल्या 25-30 वर्षापूर्वी विहिरीचे पाणी कमी झाल़े पाय विहिरीत जाण्यासाठी 50 ते 60 पाय:या पूर्वेकडून पश्चिमकडे अशा उतराव्या लागत होत्या़ जवळच हाळ व पाण्याचे कुंड होत़े सध्या त्या जागेवर दुकानांच्या टप:या ठेवल्या आहेत़ विहीर कोरडी झाल्यामुळे जवळील व्यावसायिक दुकानदार त्या विहिरीत कचरा टाकू लागल्यामुळे ती बुजली आह़े  
बारव-कुंड- शिरपूर ते करवंद रस्त्यावर शहरातील करवंद नाक्यापासून अवघ्या 2 किमी अंतरावर ठाणसिंग भास्करराव पाटील यांचे रस्त्यालगत शेत आह़े त्या शेतात अहिल्यादेवी होळकर काळातील पायविहीर, बारव व कुंड बांधण्यात आले होत़े आजही ते जसेच्या तसे आह़े होळकरांच्या काळात या विहिरीला पांढरा रंग देण्यात आल्यामुळे हे स्थान ‘धवळीविहीर’ म्हणून परिचित आह़े  विहिरीत जाण्यासाठी 5 कमानी लागतात तर 60-70 पाय:या उतराव्या लागतात़ 1965 मध्ये या विहिरीचे पाणी अचानक कमी झाले, परंतु 1968-70 मध्ये आलेल्या महापुरात या विहिरीला पुन्हा भरपूर पाणी आल़े विहिरीची खोली 125 फूट आह़े  इतिहास काळात लष्कर या मार्गाने उत्तरेकडून दक्षिणेकडे ये-जा करीत अस़े सैन्य, पांतस्थ ही जात होत़े ब्रिटीशकाळात इंग्रज सरकारने हा रस्ता बंद केल्यामुळे वाहतूक सध्याच्या मुंबई-आग्रा महामार्गाने जात आह़े अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळात ही विहीर बांधली आह़े सैन्य, लष्कर, जनतेला पिण्याचे पाणी पिणे सहज उपलब्ध व्हावे म्हणून होळकरांनी सर्वत्र पायविहिरी बांधलेल्या आहेत़
चांदपुरी-  या गावातील मगरी नाल्यालगत अहिल्यादेवी होळकरांच्या काळातील पायविहीर आह़े या विहिरीत जाण्यासाठी 4 टप्पे व दरवाजे आहेत़ आजही ते जसेच्या तसे आहेत़ त्या विहिरीतून त्याकाळी गावाचा पाणीपुरवठा होत होता़  वनावल व चांदपुरी गाव मिळून ग्रूप ग्रामपंचायत होती, 1972 मध्ये चांदपुरी ग्रामपंचायत स्वतंत्र झाली़ त्यानंतर काही कालावधीत म्हणजेच सन 1972-73 मध्ये मगरी नाल्याला पूर आल्यामुळे त्या विहिरीत गाळ साचला, पिण्याचे पाणी दूषित झाल़े त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष झाल़े सध्या त्या विहिरीत गावाचे सांडपाणी ङिारपत असल्यामुळे ती पाण्याने भरलेली आह़े जवळच घाणीच्या साम्राज्याबरोबर सांडपाण्याचे डबके साचलेले आह़े  आजही त्या विहिरीत 50 फुटार्पयत दूषित पाणी आह़े याच विहिरीच्या शेजारी हौदही बांधण्यात आलेला आह़े त्या विहिरीतले पाणी हौदात सोडून कपडे धुण्यासाठी व जनावरे पाणी पिण्यासाठी वापरत होत़े परंतु दूषित पाण्यामुळे ते पाणी वापरले जात नसल्याचे सांगण्यात आल़े सध्या ते पाणी पंपींगद्वारे शेतात पिकांकरिता वापरले जात आह़े
विखरण- या गावातही अहिल्यादेवी होळकर काळातील पायविहीर जशीच्या तशी आह़े या विहिरीला 7 दरवाजे असून  300 पाय:या आहेत़ इंग्रजी ‘यू’ आकारात ही विहीर आह़े याच विहिरीतून त्याकाळी गावाचा पाणीपुरवठा केला जात होता़ जाणकारांच्या मते या विहिरीला पहिल्या दरवाजार्पयत पाणी होत़े अवघ्या 15-20 फुटार्पयत पाणी सहज उपलब्ध होत होत़े 40-45 वर्षापूर्वीपासून पाणी वापरण्याचे बंद झाले आह़े त्यानंतर ते पाणी दूषित होवून गाळ साचला़ कचरा पडत गेला़ कालांतराने त्याकडे दुर्लक्ष होत गेल़े आजही विहिरीच्या शेवटच्या दरवाज्यालगत भरपूर पाणी आह़े घाणीच्या साम्राज्यामुळे मात्र पाय:या बुजल्या गेल्या आहेत़ विहिरीच्या जवळूनच गावाचे सांडपाणी जात़े त्यामुळे ते पाणी विहिरीत ङिारपत जात आह़े याच विहिरीसमोर अहिल्यादेवी होळकरांनी भवानी मातेचे मंदिर व बुरूज बांधला आह़े मंदिराच्या प्रांगणात भवानी मातेची यात्रा सुद्धा भरत़े
अहिल्यापूर- येथे अहिल्यादेवी होळकरांनी जणकल्याणाच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्यासाठी पाय विहीर बांधली होती. ती विहीर आजही चांगल्या स्थितीत आहे. बदलत्या काळानुसार त्या विहिरीची दुरूस्ती होणे आवश्यक होते. परंतु सदर पायविहिरीची नोंद राज्याच्या वा केंद्राच्या पुरातत्व विभागाकडे नाही. आज याच पायविहिरीत शासनाची शिवकालीन जलपुनर्भरण योजना गावाने राबविली आहे. गावाचा हा ऐतिहासिक ठेवा ग्रामस्थांनी जोपासला आहे. गेल्या 15 वर्षापासून सदर विहिरीचे पाणी आटल़े तेव्हापासून इतर पाण्याचे स्त्रोत निर्माण झाल्यामुळे विहिरीकडे दुर्लक्ष झाल़े परंतु सध्या विहिरीचे पुनर्भरण झाल्यामुळे परिसरातील विहिरी जिवंत झाल्या आहेत़
हा एक अपवाद वगळता अहिल्यादेवींनी बांधलेल्या चांदपुरी, विखरण, शिरपूर येथील पायविहिरींची दुरवस्था झालेली आह़े त्यात ग्रामस्थांनी दैनंदिन कचरा, माती इत्यादी टाकून त्या झाकून टाकल्या आहेत़  

Web Title: The shadow of the footpath built by Ahilyadevi Holkar in Shirpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.