सरंपच शशिकांत भामरे यांना लोकसहभाग पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 04:28 PM2019-02-22T16:28:21+5:302019-02-22T16:28:51+5:30
मालपुर गावात आॅनलाईन सेवा; मंत्री डॉ़भामरे यांच्या हस्ते प्रदान
साक्री तालुक्यातील मालपूर हे ३ हजार ३७५ लोकसंख्येचे गाव असून २ हजार ७५० एवढे मतदान आहे.गावाला यापूर्वी २०११-१२ मध्ये तंटामुक्त पुरोगामी विचारसरणीच्या या गावात सत्यशोधक चळवळ रूजली आहे. गावाने पूर्वीपासून फडबागायत पद्धतीने आदर्श घालून दिला आहे. गावासाठी ग्रा.पं.ने मोफत पिठाची गिरणी सुरू केली असून जे ग्रामस्थ ग्रा.पं.चे विविध कर नियमित भरतात त्यांना वर्षभर मोफत दळण दिले जाते. त्यामुळे करभरणा करण्याकडे कल वाढला आहे. अल्पदरात शुद्ध पाणीही पुरविले जाते. घनकचरा संकलनासाठी घंटागाडीची सुविधा उपलब्ध केली आहे. गावात नियमित डासप्रतिबंधक फवारणी केली जाते. शासन आपल्या दारी उपक्रम गावात राबविला. ग्रा.पं.च्यावतीने ग्रामस्थांना दिले जाणारे ७/१२ उताऱ्यासह सर्व दाखले आॅनलाईन दिले जातात. ग्रामस्थही या आॅनलाईन सेवांचा वापर करून लाभ घेतात. ग्रामसभा व इतर विकास कामातही लोकसहभाग वाढविण्याचे ग्रा.पं.चे प्रयत्न आहेत.