आमदारांची ‘शिट्टी’ची अपेक्षा ठरली फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:09 PM2018-11-27T22:09:28+5:302018-11-27T22:10:49+5:30

संताप अनावर : कार्यकर्त्यांची अधिकाºयांशी हुज्जत,आमदारांनीही केली चर्चा

Shashi's expectations for MLAs | आमदारांची ‘शिट्टी’ची अपेक्षा ठरली फोल

आमदारांची ‘शिट्टी’ची अपेक्षा ठरली फोल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  : महापालिकेच्या निवडणुकीत लोकसंग्राम पक्षाच्या उमेदवारांसाठी शिट्टी चिन्ह देण्यास निवडणूक निर्णय अधिकाºयांनी असमर्थता दाखविली. त्यामुळे आमदार अनिल गोटे यांचा संताप झाला. त्यांच्या समर्थक कार्यकर्त्याने निवडणूक निर्णय अधिकाºयांशी हुज्जत घातल्याचे दिसून आले. दरम्यान, आज निवडणुकीतील सर्व अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. 
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीत लोकसंग्राम पक्षातर्फे अधिकृतपणे फक्त  तीन उमेदवार  दिसत आहेत. यादीत ११५ अपक्ष उमेदवार असून त्यात आमदार गोटे समर्थक कोण व अन्य कोण, याबाबत उलगडा होत नाही. कारण त्यांनी अद्याप पक्षाच्या उमेदवारांची यादीही प्रसिद्ध केलेली नाही. 
आपल्या उमेदवारांना आणि समर्थक अपक्ष उमेदवारांना शिट्टी चिन्हे मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून नियमानुसार लोकसंग्राम किंवा आमदार गोटे समर्थक उमेदवारांना एकच चिन्ह देण्यास असमर्थता दर्शवित चिठ्ठया टाकून निवडणूक चिन्ह देण्यात आले. त्यामुळे आमदार गोटे समर्थकांना एकाच प्रभागात राहून वेगवेगळी चिन्हे मिळाली आहे.   शिट्टी हे एकच निवडणूक चिन्ह मिळण्याची अपेक्षा फोल ठरल्याने काही समर्थकांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांशी शाब्दीक हुज्जत घालून धिंगाणा घातला. आमदार अनिल गोटे यांनीही निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या दालनात येऊन बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र नियमानुसार चिन्हा वाटप झाल्याने ते हतबल होऊन परतले.
प्रभाग क्रमांक १२ अ मध्ये पुन्हा ट्विस्ट
मनपाच्या निवडणुकीत प्र्रभाग क्र. १२ अ मध्ये छाननीत तीन उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्याने समाजवादी पार्टीच्या फातमा अन्सारी या बिनविरोध विजयी ठरणार होत्या. मात्र राष्टÑवादी कॉग्रेसच्या फौजिया बानो यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. त्यानुसार त्यांचा अर्ज वैध ठरला. त्यामुळे या प्रभागात निवडणूक होणार होती. परंतु सपाच्या फातमा अन्सारी यांनी खंडपीठात धाव घेऊन याचिका दाखल केली. त्यानुसार राकॉच्या फौजिया बानो यांचा अर्ज फेटाळला. त्यामुळे पुन्हा फातमा अन्सारी या पुन्हा बिनविरोध ठरल्या असल्या तरी विजयाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. 
आमदारांची कोर्टात धाव 
आमदार अनिल गोटे यांनी शिट्टी चिन्हासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून बुधवार २८ रोजी तिची सुनावणी घेतली जाणार असल्याची माहिती आमदारांनी दिली. भाजपने सत्तेचा गैरवापर चालविला असून जळगाव येथून आणलेल्या अधिकाºयांनी अर्ज  वैध ठरविले, आता चिन्हासंदर्भातही तीच स्थिती आहे. आमदारांशी अशा पद्धतीने वागत असतील तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला.यामुळे गुंडाराज येऊ घातले असून धुळेकर जनतेची जबाबदारी वाढल्याचेही ते म्हणाले. 
डाव्यांचा कॉँग्रेस आघाडीला पाठिंबा 
डाव्या लोकशाही आघाडीचे नेते पोपट चौधरी, हिरालाल सापे यांनी मनपा निवडणुकीसाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा जाहीर केल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबाडे, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर उपस्थित होते. राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राजवर्धन कदमबांडे यांनी केला. 

Web Title: Shashi's expectations for MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे