शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला लावले ‘कायम शिक्षणाधिकारी गायब’चे पत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 01:44 PM2021-06-01T13:44:50+5:302021-06-01T13:45:14+5:30

महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनतर्फे व्यक्त केला रोष

Sheet of 'Permanent Education Officer Disappeared' was placed in the hall of the Education Officer | शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला लावले ‘कायम शिक्षणाधिकारी गायब’चे पत्रक

शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला लावले ‘कायम शिक्षणाधिकारी गायब’चे पत्रक

Next


धुळे- येथे गेल्या काही महिन्यापासून पूर्णवेळ माध्यमिक शिक्षणाधिकारी नसल्याने, शिक्षकांची अनेक कामे खोळंबली आहे. पूर्णवेळ शिक्षणाधिकारी द्यावा या संदर्भात अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत निवेदन देवूनही काहीच उपयोग न झाल्याने अखेर महाराष्ट्र टिचर्स असोसिएशनतर्फे मंगळवारी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला‘दोन वर्षांपासून कायम शिक्षणाधिकारी गायब’,‘आपण यांना पाहिलत का? अशा प्रकारची पत्रके चिटकविण्यात येऊन रोष व्यक्त करण्यात आला. संघटनेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळ्यातील शिक्षण विभागात गेल्या दोन वर्षांपासून प्राथमिक व माध्यमिक विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नाही. दोन्ही विभागात कायम वेतन अधीक्षकाचे पद रिक्त आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रभारीपद दिल्याने हे अधिकारी अनेक आठवडे धुळ्यात येत नाही. शिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षक नसल्याने, अनेक शिक्षकांचे कामे खोळंबली आहेत. यात शिक्षकांचे पेंशन प्रस्ताव पीएफ,मेडीकल बिल असे अनेक कामे प्रलंबित आहेत. त्याचबरोबर वेतन अधीक्षक नसल्याने, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन देखील वेळेवर होत नाही. त्याचप्रमाणे विनाअनुदानित, अंशता अनुदानित, शिक्षकांचे अनुदानाचे प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे शिक्षक अनुदानापासून वंचीत आहेत. तसेच वैय्यक्तिक मान्यता व शालार्थ आयडीचे प्रस्ताव वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे शिक्षक, वयोवृद्ध पेशनर, महिलांना किरकोळ कामासाठी सह्याघेण्यासाठी नंदुरबार, नाशिकला जावे लागते.

या संदर्भात संघटनेतर्फे शिक्षण संचालक, आयुक्त, शिक्षणमंत्री यांच्याकडे मागणी करूनही त्यांनी दुर्लक्ष केले. याविषयावर नाशिक विभागाच्या शिक्षक पदवीधर आमदारांनाही काही घेणेदेणे नाही. त्यामुळे महाराष्ट्र टिचर्स असोसिएशनतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला पत्रके लावून, कुलूप लावण्यात आले. यावेळी संघटनेच्या राज्याध्यक्षा शुभांगी पाटील, कविता भडागे, महेंद्र बच्छाव आदी उपस्थित होते.

Web Title: Sheet of 'Permanent Education Officer Disappeared' was placed in the hall of the Education Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.