घरकूल योजनेचा ‘निवारा’ लाभार्थींना आवडेना!

By admin | Published: March 15, 2017 12:08 AM2017-03-15T00:08:14+5:302017-03-15T00:08:14+5:30

महापालिका : १५०० पैकी १२०० घरकुले रिक्तच, अनास्था कायम

The 'shelter' of the home loan scheme beneficiary beneficiaries! | घरकूल योजनेचा ‘निवारा’ लाभार्थींना आवडेना!

घरकूल योजनेचा ‘निवारा’ लाभार्थींना आवडेना!

Next

धुळे : शहरात महापालिकेकडून झोपडपट्ट्यांचे निर्मूलन करून घरकूल योजना राबविण्यात येत आहेत़ मात्र सुमारे १५०० घरकुलांचे बांधकाम झालेले असतांना तब्बल १२०० घरे रिक्तच आहेत़ त्यामुळे घरकूल योजनांचा निवारा लाभार्थींना आवडत नसल्याचे दिसून येत आहे़ मनपाकडून लाभार्थ्यांना सातत्याने सूचित करून घरकुलांचा ताबा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत़
एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत शहरात घरकूल योजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत़ या योजनेंतर्गत एकूण प्रस्तावित २ हजार १६६ घरकुलांपैकी १ हजार ५०६ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे़ मोहाडी येथे सर्वाधिक ९६६ घरकुले उभारण्यात आली आहेत़ तर उर्वरित घरकुलांची कामे शहरातील विविध भागात सुरू आहेत़ काही ठिकाणी घरकूल योजनांचे काम पूर्णत्वास देखील आले आहे़ तरी लाभार्र्थींना या घरकुलांचा निवारा न आवडल्याने त्यापैकी १ हजार १७० घरकुले रिक्त पडून आहेत़
सातत्याने वादविवाद
घरकूल योजनेंतर्गत प्रस्तावित घरकुलांमुळे मोहाडी तसेच जुने धुळे परिसरात अनेकदा वादविवाद झाले आहेत़ त्याचप्रमाणे या घरकुलांमध्ये बोगस लाभार्थींचा समावेश करण्यात आल्याने चौकशीही झाली आहे़ जुने धुळयात लाभार्र्थींमध्ये असलेल्या गटबाजीमुळे मनपात दोनवेळा बिºहाड आंदोलने झाली आहेत़
लाभार्र्थींना नोटिसा
महापालिकेतर्फे घरकूल योजनेत बांधण्यात येत असलेल्या घरकुलांचे कमी क्षेत्रफळ व अपार्टंमेंट स्वरूपात असल्याने लाभार्थी त्यास विरोध करतात़ अपार्टमेंटच्या घरांमुळे जीवनशैली बदलण्याची वेळ येत असल्याचे लाभार्थींचे म्हणणे असल्याने घरकूल योजनेला पहिल्यापासून हवा तसा प्रतिसाद लाभलेला नाही़ मात्र मनपा प्रशासनाने आतापर्यंत सातत्याने लाभार्थ्यांना नोटिसा देऊन आवश्यक ११ हजार रुपये भरून व करारनामा करून घरकुले ताब्यात घेण्याबाबत सूचित केले आहे, मात्र प्रतिसाद मिळालेला नाही़

आवास योजनेचे अर्ज पडूनच़़़
एकीकडे मोहाडीमध्ये ९६६, राजीव गांधी (यशवंत)नगर ५४०, जुनी भिलाटी १४४, नवीन भिलाटी २१६, अण्णाभाऊ साठे नगर १८० व ताशा गल्लीत १२० अशी २ हजार १६६ घरकुले प्रस्तावित असताना दुसरीकडे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलांच्या विविध घटकांसाठी अर्ज मागविण्यात आले होते़ या योजनेंतर्गत तब्बल ६ हजार ५०० पेक्षा अधिक अर्ज दाखल झाले असले तरी या घरकुलांची छाननी अजूनही झालेली नाही़ घरकूल योजनांना प्रतिसाद मिळत नसल्याने मनपाचे अधिकारी अर्जांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते़

Web Title: The 'shelter' of the home loan scheme beneficiary beneficiaries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.