परराज्यातील ७८ कामगारांची निवाऱ्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 12:07 PM2020-05-03T12:07:58+5:302020-05-03T12:09:01+5:30

संडे अँकर । आरोग्य तपासणीसह राहण्याची व जेवणाची व्यवस्था ; निवाºयातील सर्वच कोरोना मुक्त

Shelter system for 78 foreign workers | परराज्यातील ७८ कामगारांची निवाऱ्याची व्यवस्था

परराज्यातील ७८ कामगारांची निवाऱ्याची व्यवस्था

googlenewsNext

धुळे : मनपामार्फत कोरोना सदृश परिस्थितीत लॉकडाऊन कालावधीत शहरात व शहर हद्दीत दाखल झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत मजूर तसेच कामगार व नागरीकांची तात्पुरती निवाराची व्यवस्था अग्रवाल विश्राम भवन येथे २० मार्चपासून करण्यात आलेली आहे.
या निवारा केंद्रात ७८ मजूर तथा नागरीक सद्यस्थितीत ठेवण्यात आलेले आहे. यात केरळ येथील ५६, उत्तर प्रदेश १४, मध्य प्रदेश २, पश्चिम बंगाल १ व महाराष्ट्रातील इतर भागातील ५ असे एकूण ७८ नागरीक तथा मजूर दाखल आहेत. सदर व्यकतींची मनपाच्या आरोग्य विभागामार्फत दररोज सकाळ व संध्याकाळ आरोग्य तपासणी केली जात़ या निवाºयातील एकही व्यकती कोरोना बाधीत नाही. दाखल नागरीकांना दोन्ही वेळेच्या जेवणाची व्यवस्था सद्यस्थितीत मनपामार्फत करण्यात येत आहे. तसेच शहरातील अन्य सेवाभावी संस्थाकडून चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यात राजेंद्र इंगळे यांच्या सहकार्य मिळत आहे. सदर निवारागृहातील ७८ व्यक्ती गोळीबार टेकडी येथे असलेल्या पश्चिम बंगालमधील १० व्यकती, पोलीस व इतर सहकारी कर्मचारी अशा सर्वांना मनपा मार्फत सकाळ व संध्याकाळ भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शालेय पोषण आहार बचत गटांनी त्यांच्या मार्फत संबंधित नागरीकांना टुथ पेस्ट, ब्रश, साबण व मास्क यांचा पुरवठा केलेला आहे. आयुक्त अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त गणेश गिरी, अभियंता कैलास शिंदे कार्यवाही करीत आहे़ तर मनपा प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी, राजेश गायकवाड परिश्रम घेत आहे़ तर आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे यांच्या नियंत्रणाखाली वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

Web Title: Shelter system for 78 foreign workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे