धुळे जिल्हयातील ३१ खेळाडूंना मिळाली शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:27 AM2019-03-27T11:27:14+5:302019-03-27T11:28:12+5:30
२०१७-१८ या वर्षात २ लाख १४ हजार रूपये वितरीत
आॅनलाइन लोकमत
धुळे : शासनाच्या क्रीडा व युवक संचालयातर्फे शालेय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदविणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाते. सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील ३१ खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवित या शिष्यवृत्तीचा लाभ मिळविला आहे. या विद्यार्थ्यांना २ लाख १४ हजार २०० रूपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. खेळाला प्रोत्साहन मिळावे उद्देशाने या शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते.
विद्यार्थ्यांमध्ये खेळाची गोडी व्हावी आणि राज्यासह देशात जागतिक पातळीवरील राष्ट्रीय खेळाडू तयार व्हावे या उद्देशाने शासनाच्या क्रीडा व युवक मंत्रालयातर्फे शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होवून यश संपादन करणाऱ्या खेळाडूंसाठी शिष्यवृत्तीची योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमतून राज्यभरात दरवर्षी शालेय पातळीवर होणाºया विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारातील स्पर्धांमध्ये सहभागी होणाºया शालेय खेळाडूंना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. त्यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून अशा खेळाडूंचे प्रस्ताव मागविले जातात. त्याची पडताळणी करून संबंधित खेळाडूला शिष्यवृत्तीचे वाटप होत असते. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील ३१ खेळाडूंनी विविध प्रकारच्या शालेय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. त्यात काहींनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकापर्यंत मजल मारली. तर काहींना यश मिळाले नसले तरी त्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविल्याने तेही शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यात सहा खेळाडूंनी प्रथम, आठ खेळाडूंनी द्वितीय तर सहा खेळाडूंनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. इतर खेळाडंूनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. शिष्यवृत्ती मिळविणाऱ्यांमध्ये कनोसा कॉन्व्हेंट, जो. रा. सिटी, न्यु. सिटी व आर. सी.पटेल स्कूलचे सर्वाधिक खेळाडू असल्याचे सांगण्यात आले.