लालपरीवर झळकणार शिंदेसेनेच्या प्रचाराचे बॅनर; चार्जेस भरून हजार एसटी बसेसवरील जागा बुक  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 06:44 AM2024-04-18T06:44:17+5:302024-04-18T06:46:04+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या एक हजार बसेस लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा प्रचार करणार आहेत.

Shindesena's campaign banner will be displayed on Lalpari Book seats on thousand ST buses by paying charges | लालपरीवर झळकणार शिंदेसेनेच्या प्रचाराचे बॅनर; चार्जेस भरून हजार एसटी बसेसवरील जागा बुक  

लालपरीवर झळकणार शिंदेसेनेच्या प्रचाराचे बॅनर; चार्जेस भरून हजार एसटी बसेसवरील जागा बुक  

श्याम सोनवणे, लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे
: राज्य परिवहन महामंडळाच्या एक हजार बसेस लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा प्रचार करणार आहेत. एसटी बसेसवर जाहिरात करण्यास परवानगी देण्यात आली असून, शिंदेसेनेने त्यासाठीचे हक्क प्राप्त केले आहेत. शिंदेसेनेच्या व्यतिरिक्त इतर कुणाच्याही जाहिराती परवानाधारक अथवा इतरांमार्फत प्रसारित होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे अतितातडीचे परिपत्रक राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना महामंडळाच्या नियोजन व पणन महाव्यवस्थापकांनी पाठविले आहे. 

प्रचारासाठी आपण ज्या पद्धतीने भाडेकराराने खासगी वाहने लावताे, तशाच भाडेकराराने एसटी बसवर या जाहिराती झळकतील. त्यासाठी जे  काही चार्जेस असतील, ते अदा करण्यात येतील, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांना सांगितले.

Web Title: Shindesena's campaign banner will be displayed on Lalpari Book seats on thousand ST buses by paying charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.