शिंदखेडा हगणदरीमुक्त घोषित
By admin | Published: July 2, 2017 10:48 AM2017-07-02T10:48:40+5:302017-07-02T10:48:40+5:30
स्वच्छ भारत : केंद्रीय समितीने केली पाहणी; उपनगराध्यक्ष व सभागृह नेत्यांनी दिली माहिती
Next
ऑनलाईन लोकमत
शिंदखेडा, दि.2 - धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरात केंद्रीय समितीने नुकत्याच केलेल्या पाहणीवरून शिंदखेडा शहराला हगणदरीमुक्त शहर घोषित केल्याची माहिती शनिवारी नगरपंचायतच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख व सभागृह नेते दीपक देसले यांनी दिली आहे.
नगपंचायतीमार्फत 2015 पासून स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत शहरात सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामावर विशेष भर देण्यात आला.
शहरामध्ये नागरिकांना हगणदरीमुक्तीची संकल्पना स्पष्ट करून आजर्पयत 1, 250 लाभाथ्र्याना प्रत्येकी 12 हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. याशिवाय शहराच्या विविध 13 सार्वजनिक शौचालयांमधून 225 सीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
केंद्रीय समितीतील प्रमुख विश्वजित सिंग यांच्या उपस्थितीत नियुक्त पथकाने शहरात पाहणी केली. त्यांच्या अहवालानुसार वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रकारातील शौचालयांचे काम उत्कृष्ट असल्याचे पथकातील अधिका:यांनी नमूद केले असून याबाबत 28 जून रोजी केंद्राच्या ‘क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया’ या त्रयस्त समितीने अहवाल दिला.
शिंदखेडा हगणदरीमुक्त शहराच्या कामासाठी मुख्याधिकारी अजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता अभिजित मोहिते, आरोग्य विभागातील अशोक माळी, अबू हसन शेख, हुसेन मेहतर, वसीम मेहतर व गुड मॉर्निग पथकाने परिश्रम घेतले. त्यांना बांधकाम अभियंता ईश्वर सोनवणे, संगणक अभियंता सचिन पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी दिनेश फुलपगारे, गणेश गावीत यांचे सहकार्य लाभले.
शिंदखेडा हगणदरीमुक्त शहराचा या सन्मानाबद्दल विद्यमान नगराध्यक्षा मथुराबाई मराठे, गटनेते प्रा. सुरेश देसले, अनिल वानखेडे, सभागृह नेते दीपक देसले, उपनगराध्यक्ष उल्हासराव देशमुख, आरोग्य सभापती सुषमा चौधरी यांनी समाधान व्यक्त केले.