शिरपुरात पालटले अमरधामचे रूप!
By admin | Published: April 8, 2017 04:16 PM2017-04-08T16:16:40+5:302017-04-08T16:16:40+5:30
अंत्ययात्रेसाठी येणा:या नागरिकांना सावली मिळावी, याउद्देशाने या परिसरात शंभराहून अधिक बदाम व विविध वृक्षांची लागवड केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हरित व मुलभूत सुविधा उपलब्ध : सावलीसाठी 100 हून अधिक बदाम वृक्षांची लागवड
शिरपूर, जि. धुळे, दि. 8 : शिरपूर वरवाडे नगरपालिकेने शहरातील अरुणावती नदीच्या काठावरील खंडेराव मंदिरासमोर असलेल्या अमरधाममध्ये अत्याधुनिक सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच अंत्ययात्रेसाठी येणा:या नागरिकांना सावली मिळावी, याउद्देशाने या परिसरात शंभराहून अधिक बदाम व विविध वृक्षांची लागवड केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मृत झालेल्या शरीराला अगिAडाग देण्यासाठी शिरपूर शहरातील अरूणावतीच्या काठी व खंडेराव मंदिरासमोर अमरधाम आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून अमरधामची प्रचंड दुरवस्था झाली होती. परिणामी नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. याची दखल घेऊन येथील न.पा. प्रशासनाने अद्ययावत असे अमरधाम तयार केले आहे.
एकाच वेळी पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार
शिरपूर नपाने पूर्वीच्या अमरधामच्या रचनेत बदल केला. त्यानुसार आता एकाचवेळी त्याठिकाणी 5 मृतदेहांचे दहन करता येणार आहे. त्यासाठी 5 सारण तयार करण्यात आली आहेत. त्या सारणींच्या आकार उंच असा गोल घुमटाचा आहे तर ओटा सिमेंट कॉँक्रिटचा तयार केला आहे.
निंब, बदाम वृक्षाची लागवड
येथील वैकुंठ धाम हे हरित अमरधाम असून या प्रांगणात बदाम व तसेच भिंतीच्या कुंपनाला निंब वृक्षाची लागवड केली आहे. त्यामुळे येथील वातावरण पूर्णपणे हरित झाल्यासारखे वाटत आहे. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी दोन भव्य गॅलरी तयार केल्या असून तेथे खुच्र्याची सुविधाही केली आहे. ऊन, वारा व पाऊस आला तरी नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
परिसर स्वच्छतेसाठी सफाई कामगारांची नियुक्ती
अमरधाम अतिशय स्वच्छ व साफ राहण्यासाठी कायमस्वरूपी त्या ठिकाणी सफाई कामगारांची व्यवस्था केली आह़े दररोज सकाळी सफाई कामगार येथील प्रांगण स्वच्छ करतात. तसेच याठिकाणी मूबलक पाणी असल्यामुळे अमरधामचा परिसर हा स्वच्छ केला जातो.
पाणी व आंघोळीची सुविधा
येथे स्वतंत्र कुपनलिकेची व्यवस्था केली आहे. अंत्यसंस्कारासाठी व दशक्रियेसाठी आलेल्या नागरिकांसाठी खास आंघोळीचीही सुविधा येथे उपलब्ध राहणार आहे. यासाठी येथे स्नानगृहदेखील उभारले आहे.
प्रेत दहनासाठी मोफत जळाऊ लाकूड
दहनासाठी मोफत जळाऊ लाकूड पुरविण्याची सुविधादेखील उपलब्ध करून दिली आह़े
मृत्यूची नोंदसाठी कर्मचा:याची स्वतंत्र व्यवस्था
मृत्यूची नोंद घेण्यासाठी पालिका प्रशासनाने येथे स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यादृष्टीने याठिकाणी कायमस्वरूपी कर्मचा:याची नियुक्ती आहे.