शिरपूर न.पा. ची 98 टक्के कर वसुली

By admin | Published: April 19, 2017 12:59 PM2017-04-19T12:59:16+5:302017-04-19T12:59:16+5:30

शिरपूर नगरपालिका प्रशासनाची विविध करापोटी 98.50 टक्के वसुली झाली आहे.

Shirpur NP 98 percent tax recovery | शिरपूर न.पा. ची 98 टक्के कर वसुली

शिरपूर न.पा. ची 98 टक्के कर वसुली

Next
>धुळे,दि.19- राज्यात सलग तीन वेळा संत गाडगे बाबा नागरी स्वच्छता अभियानाचा प्रथम पुरस्कार पटकावणारी शिरपूर-वरवाडे नगरपरिषद ही एकमेव नगरपरिषद आहे.  या वर्षी शिरपूर नगरपालिका प्रशासनाची  विविध करापोटी 98.50 टक्के वसुली झाली आहे.  
शिरपूर नगरपालिकेची स्थापना सन 1869 साली झाली़ सन 1985 मध्ये न.पा. ची  सत्ता हाती आल्यानंतर आमदार अमरिशभाई पटेल यांनी सातत्याने विविध कराची वसुली 100 टक्के करण्यावर भर दिला. तेव्हापासून ते आजर्पयत 95 टक्क्याच्या पुढेच कराची वसुली झाली आहे.  सन 1989 ते 1993 या आर्थिक चार वर्षात 100 टक्के वसुली करण्यात आली आह़े 
शिक्षण, करमणूक, जाहिरात व दुकान भाडे वसुली 100 टक्के
सन 2016-17 या आर्थिक वर्षात करांची वसुली 98़50 टक्के करण्यात आली़ घरपट्टी विभागाची 4 कोटी 25 लाख रूपये उद्दिष्ट असतांना 4 कोटी 18 लाख म्हणजेच 98़32 टक्के वसुली करण्यात आली़ शासकीय शिक्षण कर व रोजगार हमी करांची 100 टक्के वसुली केलेली आह़े पाणीपट्टी विभागाची 1 कोटी 89 लाख 20 हजार रूपये असतांना प्रत्यक्षात 1 कोटी 86 लाख 29 हजार म्हणजेच 98़46 टक्के वसुली, बाजार विभागाकडील दुकान भाडे वसुली 100 टक्के, करमणूक कर व जाहिरात वसुली 100 टक्के वसुली करण्यात आली़
बहुतांशी विभागांची 100 टक्के वसुली झाल्याबद्दल नगराध्यक्षा पटेल यांनी विविध करांची वसुली करणारे जगदीश बारी, सचिन अग्रवाल, दीपक मराठे, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, प्रशासकीय अधिकारी माधव पाटील, संजय हासवाणी, गोविंद चावडा, कमलेश जैन, मोहन चौधरी यांचे कौतुक केल़े

Web Title: Shirpur NP 98 percent tax recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.