राज्यात शिरपूर न.पा. ६व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 07:33 PM2020-08-21T19:33:54+5:302020-08-21T19:34:11+5:30

स्वच्छ सर्वेक्षण अभियान : देशात ४२व्या क्रमांकावर मिळविले स्थान

Shirpur N.P. in the state. 6th place | राज्यात शिरपूर न.पा. ६व्या स्थानी

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : देशातील २ हजार शहरांचा समावेश असलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२० चा निकाल जाहिर करण्यात आला आहे. त्यात शिरपूर- वरवाडे नगरपरिषद देशातून ४२व्या स्थानावर तर राज्यातील पश्चिम झोनमध्ये ६ व्या स्थानावर आहे़ गेल्यावर्षी ही नगरपालिका देशात ४९ व्या स्थानी होती़ स्वच्छ सर्वेक्षणाबाबत राज्य आणि केंद्रीय समितीने डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० मध्ये पहाणी केली होती़ त्यानंतर हा निकाल नुकताच घोषित करण्यात आला़
केंद्रसरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियांतर्गत देशातील १ लाख लोकसंख्येतील २ हजार शहरात शिरपूर शहराचा देखील समावेश असून या अभियानाची शिरपूर नगरपालिकेत अंमलबजावणी करण्यात येत आहे़ मागीलवर्षी शिरपूर नगरपालिका ४९ व्या स्थानी होती़ त्यानंतर नगरपालिकेने स्वच्छतेबाबत ओला-सुका कचरा वर्गीकरणावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे यंदा ४२व्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे़
स्वच्छ सर्वेक्षणाबाबत राज्य आणि केंद्रीय समितीने डिसेंबर २०१९ आणि जानेवारी २०२० मध्ये पहाणी केली होती़ यावेळी समितीने वेगवेगळ्या प्रभागात भेटी देवून पहाणी केली होती़ तसेच नागरिकांचा अभिप्राय, ओला-सुका कचरा वर्गीकरण, प्लॅस्टिक बंदी, घरोघर कचरा संकलन, कागदपत्रांची पूर्तता आणि घनकचरा प्रक्रिया प्रकल्प असे निकष असून समितीने तपासणी केली होती़
देशातील पहिले स्वच्छता मंदिर या पालिकेने उभारले आहे़ विशेषत: या शहरात होम कंपोस्टींगमध्ये शहरवासियांचा अधिक सहभाग, १२ घंट्यागाड्याद्वारे कचरा संकलन केला जातो़ २४ तासाच्या आत तक्रारींचे निवारण केले जाते़ जनजागृती अभियानात स्मार्ट गृहिणी स्पर्धा घेण्यात आली होती़ विशेषत: शहरात १०० टक्के प्लॅस्टीक बंदी घालण्यात आली आहे़ त्यानुसार नगरपालिकेने देशात ४२ वे तर राज्यात ६ वे स्थान पटकावले आहे़ गेल्या वर्षी या नगरपालिकेने देशात ४९ वा तर राज्यात ३९ वा क्रमांक पटकाविला होता़ गेल्या वर्षाचा सुविधांमध्ये अधिक भर पडल्यामुळे यावर्षी टॉपर शहरामध्ये या नगरपालिकेचा समावेश करण्यात आला़
राज्यात प्रथम क्रमांक कराड, द्वितीय लोनावळा, तृतीय रत्नागिरी, चतुर्थ क्रमांक बालापूर, पाचवा संगमनेर तर सहावा क्रमांक शिरपूर पालिकेने प्राप्त केला आहे़ या पालिकेला ४२९४़६७ गुण प्राप्त केले आहे़
माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, सीईओ अमोल बागुल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, माधवराव पाटील यांनी अभियानात शहरवासियांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़
स्मार्ट सिटी योजना सरकारने जाहिर करण्यापूर्वीच शिरपूर नगरपालिकेची वाटचाल माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या दुरदृष्टीतून सुरू झाली आहे़ त्यादृष्टीने कॉलनी वसाहतींमधील खुल्या जागेवर लाखो निंब वृक्षाची झाडे लावली आहेत़ सांडपाण्याची प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला आहे़ पिण्याच्या पाण्याचे पुढील ३० वर्षाचे नियोजन, स्वच्छता, महिलांसाठी गार्डन, नागरिकांच्या आरोग्यासाठी योग विद्याधामची उभारणी, अद्ययावत असे इंदिरा गांधी हॉस्पिटल, स्वच्छतेसाठी लागणारे आधुनिक यंत्रे खरेदी करून त्याद्वारे स्वच्छतेचे कामे सुरू आहे़
-जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा

Web Title: Shirpur N.P. in the state. 6th place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.