पंचायत राज समितीकडून ‘शिरपूर पॅटर्न’ची पाहणी

By admin | Published: July 9, 2017 01:13 AM2017-07-09T01:13:41+5:302017-07-09T01:13:41+5:30

आमदारांनी जलसंधारणाची माहिती जाणून घेण्यात दाखविला रस

'Shirpur Pattern' survey by Panchayat Raj committee | पंचायत राज समितीकडून ‘शिरपूर पॅटर्न’ची पाहणी

पंचायत राज समितीकडून ‘शिरपूर पॅटर्न’ची पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर :  तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत असलेली कामे पाहण्यासाठी तीन आमदारांची समिती आली. या समितीने ‘शिरपूर पॅटर्न’अंतर्गत झालेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करून यासंदर्भात प्रकल्प संचालक सुरेश खानापूरकर यांच्याकडून अधिकाधिक माहिती जाणून घेतली़
गेल्या शुक्रवारी पंचायत राज समितीचे प्रमुख आमदार आऱ टी़ देशमुख, आमदार राजेंद्र नजरधने व आमदार कृष्णा गजबे हे  तालुक्यातील कामे पाहण्यासाठी आले होते़या  आमदारांना ‘शिरपूर पॅटर्न’चे प्रकल्प संचालक सुरेश खानापूरकर यांनी येथील शासकीय विश्रामगृहात जाऊन ‘शिरपूर पॅटर्न’संदर्भात सविस्तर माहिती दिली़
तालुक्यात आतापर्यंत ५५ गावांमध्ये १७८ साखळी बंधारे बांधली गेली आहेत़ जेणेकरून वर्षभर पाऊस पडला नाही, तरी किमान दुबार पिके घेऊ शकतात, असे खानापूरकर यांनी आमदारांना सांगितले़ या तालुक्यात पाणीटंचाई नाही, टँकर लागत नाही, असेदेखील त्यांनी सांगितले़ जलसंधारणाच्या कामामुळे आतापर्यंत १० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ लागली आहे़ ग्रामस्थांचे सहकार्य लाभले, तर निश्चितच ३०० बंधारे बांधण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
या पावसाळ्यात कमी पाऊस होऊनदेखील काही बंधारे ओव्हर फ्लो, काही बंधाºयात पाणी तर काही अजूनही कोरडे आहेत़
वाडी, अर्थे, बोराडी, जोयदा, खंबाळे, सांगवी या भागातील बंधाºयात मोठ्या प्रमाणावर पाणी असून तालुक्यातील पूर्व भागात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे नागेश्वर परिसरातील बंधारे कोरडे आहेत़ त्रिस्तरीय आमदारांच्या समितीला प्रत्यक्ष वाडी व बोराडी येथील बंधाºयांवर नेऊन त्यांना बंधारा कमी खर्चात कसा केला जातो, पाणी किती साठवले जाते, किती जमिनीत मुरते यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. या बंधाºयांतील पाणी पाहून आमदारांनी देखील आश्चर्य व्यक्त केले.

Web Title: 'Shirpur Pattern' survey by Panchayat Raj committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.