चौदा वर्षांपासून शिरपूर पॅटर्नचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:47 PM2019-03-08T22:47:31+5:302019-03-08T22:47:50+5:30
शिरपूर : उखळवाडीतील बंधारा भूमिपूजनप्रसंगी भूपेशभाई पटेल
शिरपूर : तालुक्यासाठी आमदार अमरिशभाई पटेल यांनी गेली ३५ वर्षे सेवेसाठी दिली आहेत. सर्वच क्षेत्रात फार मोठे त्यांनी योगदान दिले आहे. सर्व माजी आमदार व नेत्यांनी देखील काम केले आहे. राजकारण व पक्षभेद सोडून गेल्या १४ वर्षांपासून शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून तालुक्यात काम प्रभावीपणे होत असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले.
उखळवाडी (भामपूर गावाजवळ) येथे माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते शिरपूर पॅटर्न जलसंधारणाच्या २०७ व्या बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी माजी जि.प. सदस्य वसंत पाटील, माजी जि.प. सभापती बी.एच.पवार, जानकीराम गुजर, प्रतापराव पाटील, माजी पं.स.उपसभापती दिपक गुजर, मांडळचे माजी सरपंच भटू माळी, विखरणचे सरपंच प्रविण पाटील, माजी सरपंच श्याम पाटील, अर्थे बु. सरपंच साहेबराव पाटील, अर्थे खु. सरपंच अनिल गुजर, नवल वंजारी, सुनिल जैन, दिनेश जोशी, नवलसिंग परदेशी तसेच पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दिनेश जोशी यांनी शिरपूर पॅटर्न पद्धतीने केलेल्या विविध कामांची सविस्तर माहिती देवून उखळवाडी येथील बंधाऱ्यामुळे पाण्याची कशी मुबलकता होईल हे स्पष्ट केले. सुत्रसंचलन एस.डी.पाटील यांनी केले.