शिरपूर तालुक्यात सरपंचपदासाठी ‘गणितं’ बदलणार!
By admin | Published: July 7, 2017 01:06 PM2017-07-07T13:06:18+5:302017-07-07T13:06:18+5:30
शिरपूर तालुक्यातील 17 ग्रा.पं.ची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर
Next
ऑनलाईन लोकमत
शिरपूर , दि.7 - सरपंच निवड आता थेट जनतेतून होणार असल्याने येत्या 2-3 महिन्यात होणा:या तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींची राजकीय गणितं बदलणार आहेत़ निवडणूक होणा:या तालुक्यातील ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षणाची प्रारूप यादी प्रशासनाने नुकतीच जाहीर केली आह़े त्यावर 15 जुलैला हरकती व सूचनांची सुनावणी केली जाणार आह़े
ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणा:या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आह़े त्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवातही केली होती़ परंतु गत रविवारी शासनाने सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतल्याने आता जवळपास सर्वच ग्रामपंचायतींमधील राजकीय गणिते बदलणार आहेत़ सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवारांना आता प्रभागापुरता विचार न करता संपूर्ण गाव समोर ठेवून व्यूहरचना करावी लागणार आह़े
तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आह़े त्यात ग्रामपंचायतनिहाय एकूण वॉर्ड व कंसात सदस्य संख्या पुढीलप्रमाणे-
खंबाळे 4 (13), अर्थे बु़ 4 (11), अर्थे खुर्द (11), महादेव दोंदवाडे 3 (9), करवंद 4 (13), वरझडी 4 (11), त:हाडकसबे 3 (9), अजनाड 4 (11), मांजरोद 4 (11), हाडाखेड 4 (13), हिसाळे 4 (11), खर्दे खुर्द 2 (7), अंजदे बु़ 4 (11), थाळनेर 6 (17), बोराडी 6 (17), तोंदे 4 (11) व वाघाडी 5 (15) यांचा समावेश आह़े