शिरपूर तालुक्याची हगणदरीमुक्तीकडे वाटचाल
By admin | Published: March 31, 2017 03:21 PM2017-03-31T15:21:42+5:302017-03-31T15:21:42+5:30
शिरपूर तालुक्यातील 118 पैकी 44 ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्याची माहिती गटविकास अधिकारी मोहन बागुल यांनी जाहीर केले आहे.
Next
शिरपूर,दि.31- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुक्यातील 118 पैकी 44 ग्रामपंचायती सन 2016-17 मार्च अखेर हगणदरीमुक्त झाल्या आहेत़ उर्वरित ग्रामपंचायती येत्या डिसेंबर अखेर पूर्णत: हगणदरीमुक्त होतील, असे येथील पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी मोहन बागुल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितल़े़
येथील पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण विभाग अंतर्गत सन 2016-17 या वर्षात संपूर्ण तालुका हगणदरीमुक्त करण्यासाठी घोषित केला आह़े त्या अनुषंगाने शासनस्तरावरून जि़प़चे अध्यक्ष शिवाजी दहिते, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ अजरुन गुंडे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांच्या वेळोवेळी बैठका घेऊन हा तालुका पूर्णत: म्हणजेच 100 टक्के हगणदरीमुक्त कसा होईल या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आह़े तसेच कमी टक्के शौचालये असलेल्या गावातील ग्रामसेवकांना या संदर्भात नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत़
सन 2016-17 या आर्थिक वर्षात स्वच्छ भारत मिशन कक्षातर्फे 13 हजार 888 शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होत़े त्यापैकी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ार्पयत या तालुक्यात नऊ हजार 517 उद्दिष्ट साध्य करण्यात आले असून 45़59 टक्के काम साध्य झाले आह़े
31 मार्चअखेर उर्वरित चार हजार 371चे उद्दिष्ट साध्य होण्याच्या मार्गावर आह़े त्यामुळे या वर्षात 19 ग्रामपंचायती हगणदरीमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत़
मार्चअखेर हगणदरीमुक्त होणा:या ग्रामपंचायतींमध्ये हातेड, जातोड, वासर्डी, हिंगोणी बु।।, जवखेडा, अहिल्यापूर, ङोंडेअंजन, वरझडी, अंजदे खुर्द, हेंद्रयापाडा, ताजपुरी, भाटपूरा, रूदावली, पिळोदा, गु:हाळपाणी, अंतुर्ली, पनाखेड, आमोदा व दुर्बळ्या अशा एकूण 19 ग्रामपंचायती होण्याच्या मार्गावर आहेत़
यापूर्वी शिरपूर तालुक्यातील 25 ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत़
यापूर्वी हगणदरीमुक्त झालेल्या ग्रामपंचायती
यापूर्वी तालुक्यात 25 ग्रामपंचायती पूर्णत: हगणदरीमुक्त झालेल्या आहेत़ त्यात नांथे, नवे भामपूर, पिंप्री, साकवद, टेंभे बु़, उप्परपिंड, बाभुळदे, बाळदे, भोरटेक, बोरगांव, चांदपुरी, घोडसगांव, गिधाडे, हिगांव, हिंगोणीपाडा, हिवरखेडा, जैतपूर, जामन्यापाडा, जापोरा, कळमसरे, खामखेडा प्ऱथा़, खर्दे खुर्द, मांडळ, नटवाडे, पिंपळे या ग्रामपंचायतींचा समावेश आह़े