शिरपूर पाण्याचे टॅँकर आडवे लावून केली गावबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:05 PM2020-04-13T22:05:37+5:302020-04-13T22:06:10+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या गुºहाडपाणी येथे ग्रामरक्षक दलातर्फे बंदोबस्त
शिरपूर : राज्याच्या ग्रामीण भागात अवैध मद्यनिर्मिती व मद्यविक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकसहभागातून स्थानिक पातळीवर ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तसे निर्देश काही महिन्यांपूर्वी दिले होते. त्याची अमलबजावणी करून ग्रामस्तरावर ग्राम रक्षक दलाची स्थापना करण्यात आली होती. हीच रक्षक दल ग्रामीण भागात कोरोना संक्रमण टाळण्यासाठी पुढे सरसावली असून सीमावर्ती भागात चोख बंदोबस्त ठेवत आहे.
शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम क्षेत्रातील महाराष्ट्र- मध्यप्रदेशच्या सिमेवर वसलेल्या गुºहाडपाणी येथे ग्रामरक्षक दलाने सिमेवर पाण्याचे टँकरच आडवे करून व काटेरी झुडुपे ठेवत गाव बंदी केली आहे़ त्याच बरोबर या सिमेरेषेवर दिवस-रात्र पहारा देण्यात येवून पुर्णपणे पाळत ठेवण्यात आले आहे.
कोरोना बाधित सेंधवा शहराच्या लागून असलेल्या या गावांना पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता आहे. यासाठी येथील तरुण पोलिस पाटील सरकार पावरा यांनी पोलिस प्रशासनाकडे पोलिस बंदोबस्तसाठी मागणी केली आहे़ तालुक्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वत रांगेतील मध्यप्रदेश सिमेलगत असलेल्या शेवटच्या दुर्गम क्षेत्रातील गावे आहेत. कोरोनाचे सावट या गावांवर आहे.
सेंधवा सिमेलगत गावांची अवस्था अत्यंत विदारक आहे. गुºहाडपाणी ग्रृप ग्रामपंचायती अंतर्गत सितारापाडा, थुवानपाणी, मेंढाबर्डी, सामºयादेवी, कंज्यापाणी, निशानपाणी, प्रधानदेवी, पळसपाणी, कडश्यापाणी, निंबाबर्डी, धाबादेवी असे जवळपास १८ लहानमोठी गाव-पाडे आहे. वरील सर्व गाव-पाडे ही मध्यप्रदेश सीमेवर आहेत़ या गाव-पाड्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सेंधवाशी सबंध येतो. या परीसरात अनेक लहान पायवाट असून चोरट्या मार्गांनी नागरीकांचे ये-जा सुरु आहे़ याठिकाणी रात्री-बेरात्री चोरट्या मार्गाने वाहतुक सुरु असते. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा या गावांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामिण भागात शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असून सर्वत्र गाव शिवार बंद केले आहेत. तरी देखील गांभीर्याने योग्य खबरदारी घेऊन योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. गावातील दारूसह अन्य अवैध व्यावसायांना आळा घालण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करणे असा या हेतुने दलाची स्थापना करण्यात आली, परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे तरुण दिवस-रात्र पाळत ठेवत मध्यप्रदेश मधून येणाऱ्यांना चांगलेच धुडकावून लावत आहेत़