शिरपूरच्या प्राजक्ता शिंदेला कास्य पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:00 PM2018-12-01T22:00:25+5:302018-12-01T22:00:54+5:30
रंधे क्रीडा संकुलात बॉक्सिंग खेळाचे प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : गुहाटी-आसाम येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्राजक्ता युवराज शिंदे पोहचून हरली़ त्यामुळे तिला कास्य पदकावरच समाधान मानावे लागले़
२६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान गुहाटी-आसाम येथे ६४ व्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा १७ वर्षाआतील मुले-मुलींच्या गटातील झाल्यात़ त्यात येथील सावित्री रंधे कन्या स्कूलची प्राजक्ता शिंदे हिची निवड करण्यात आली होती़ शिरपूर सारख्या ग्रामीण भागात राहणाºया प्राजक्ता शिंदे हिने बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण २०१६ पासून सुरुवात केली़ आज त्या खेळात ती राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करत आहे़ येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते विश्वासराव रंधे क्रीडा संकुलात बॉक्सिंग खेळाचे प्रशिक्षण घेत आहे़ ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले होते़ सुयशाबद्दल धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ़ तुषार रंधे, उपाध्यक्ष एकनाथ बोरसे, क्रिडासंचालक एल.के.प्रताळे, प्रा.राधेश्याम पाटील, विजेंद्र जाधव, अमोल शिरसाठ, धिरज पाटील, भरत कोळी, नूर तेली, मनोज चौधरी, धुळे बॉक्सिंग संघटनेचे महासचिव मयूर बोरसे यांनी कौतुक केले़