धुळ्यात आमदारांच्या विरोधात शिवसेना एकवटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 10:10 PM2018-04-06T22:10:40+5:302018-04-06T22:10:40+5:30

शिवसेनेचा मूकमोर्चा : हिलाल माळी विरोधात दाखल गुन्हे मागे घेण्याची एकमुखी मागणी

Shiv Sena assembled against Dhonday MLAs | धुळ्यात आमदारांच्या विरोधात शिवसेना एकवटली

धुळ्यात आमदारांच्या विरोधात शिवसेना एकवटली

Next
ठळक मुद्देआमदारांच्या विरोधात मोर्चामूकमोर्चाचे सभेत रुपांतरपोलीस अधीक्षकांना निवेदनपोलिसांचा बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जुने धुळे परिसरातील पुरातन महादेव मंदिराच्या परिसराचे बांधकाम तोडण्यास विरोध केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी, त्यांचे कुटुंब आणि परिसरातील नागरिकांविरोधात दाखल गुन्हे तातडीने मागे घेण्यासह अन्य मागण्यासाठी शिवसेनेने मूकमोर्चा काढला़ आमदार अनिल गोटे यांच्या कार्यपध्दतीवर सभेतून टिका केली़ त्यानंतर पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांना निवेदन सादर केले़ 
घटनेची पार्श्वभूमी
पांझरा नदी पात्राच्या दोन्ही बाजुने रस्त्याचे काम सुरू आहे़ जुने धुळे भागातील पांझरेच्या किनाºयावर पुरातन महादेव मंदिर आहे़ मंदिराच्या दक्षिणेला लिंगायत समाजाची दफनभूमी आहे़ मंदिराच्या पुर्वेला जुना वहिवाट रस्ता असून मंदिराच्या पश्चिमेस पांझरा नदी पात्र आहे़ ३० मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास आमदार अनिल गोटे हे महादेव मंदिर परिसर व लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीजवळ आपल्या सहकाºयांसोबत आले़ त्यांच्यासोबत पोकलेन, जेसीबी मशिन व मोठे माती वाहक डंपर घेऊन बांधकाम तोडण्याच्या सामग्रीसह दाखल झाले़ रात्रीच बांधकाम तोडण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी आणि परिरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली़ हिलाल माळी यांनी याबाबत जाब विचारला़ यानंतर त्यांच्याविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले़ 
आमदारांच्या विरोधात मोर्चा
मनोहर चित्रमंदिराजवळील छपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवसेनेच्या मूकमोर्चाला सुरुवात करण्यात आली़ हा मोर्चा सरळ आग्रा रोडने कराचीवाला खुंटाकडून महापालिका जवळून झाशीच्या राणी पुतळ्याला वळसा घालून राजवाडे बँकेकडून सरळ क्युमाईन क्लबजवळून जेल रोडवर मोर्चाचा समारोप करण्यात आला़ या मोर्चात संपर्क प्रमुख के़ पी़ नाईक, सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, महिला संपर्क प्रमुख प्रियंका घाणेकर, माजी आमदार प्रा़ शरद पाटील, मनपा विरोधी पक्ष नेत्या वैशाली लहामगे, पुष्पा बडगुजर, लोकसभा संघटक महेश मिस्तरी, माजी महापौर भगवान करनकाळ, ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके, माजी जिल्हा प्रमुख बापू शार्दुल, महानगर प्रमुख सतीश महाले, भूपेंद्र लहामगे, संजय गुजराथी, माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र पाटील, सुनील बैसाणे, युवा जिल्हा प्रमुख पंकज गोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ 
मूकमोर्चाचे सभेत रुपांतर
विविध मार्गावरुन निघालेल्या या मूकमोर्चाचे रुपांतर जेलजवळ चौकात सभेत करण्यात आले़ यावेळी पदाधिकाºयांनी आमदार अनिल गोटे यांच्या कार्यपध्दतीवर आगपाखड करत टिकास्त्र सोडले़ संपर्क प्रमुख के़ पी़ नाईक म्हणाले, जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्यावर अन्याय होत आहे़ हुकूमशाहीमुळे हे होत असल्याने त्याचा निषेध नोंदविण्यासाठी मोर्चा काढण्याचा प्रसंग ओढवला़ उचलेगिरी वेळीच थांबवावी़ आमदारांच्या पायाखालची वाळू सरकत आहे़ खोटे आणि वितंडवाद उभा केला जात आहे़ मतदार जागृत असल्याचेही ते म्हणाले़ प्रियंका घाणेकर म्हणाल्या, नागरिकांच्या जोरावर आम्ही उभे आहोत़ हिलाल माळी यांचे कार्य लक्षात घेता त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे़ कोणावरही अन्याय होत असेल तर तो दूर करण्यासाठी हिलाल माळी यांचा पुढाकार असतो, असाच काहीसा प्रकार घडला आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदविण्यात आले़ याला वाचा फोडण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे़ यावेळी उपस्थित पदाधिकाºयांनी आक्रमक भावना व्यक्त करत आमदार अनिल गोटे यांच्यावर टिकास्त्र सोडले़ 
पोलीस अधीक्षकांना निवेदन
सभेनंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांना निवेदन सादर केले़ निवेदनातून काही मागण्या सादर केल्या़ त्यात पांझरा नदीकिनारी असलेले महादेव मंदिर, हनुमान मंदिर, गोरक्षनाथ मंदिरासह अन्य धार्मिक स्थळांना चुकूनही धक्का लागता कामा नये़ नदी किनारी भोई समाजाची घरे सुरक्षित रहावी़ कुठलाही विकास कामांचा आराखडा तयार होऊन त्याचे कार्यादेश होत असतात़ त्या प्रकारचा कार्यादेश पांझरा पात्रात दोन्ही बाजूस सुरू असलेल्या रस्त्यांबाबत झालेला असेल, त्यानुसार रस्त्याचे लाईनआऊट देऊन मार्किंग का केली नाही, परिणामी अनर्थ घडण्याची दाट शक्यता आहे़ परिणामी बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारांना लेखी समज द्यावी़ यापुढे केव्हाही कुठेही रस्त्याची दिशा बदलण्याचे काम झाले तर संबंधित विभाग आणि ठेकेदार जबाबदार राहतील अशी जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करण्यात यावी़ यापुढे आमदार गोटे यांनी कुठलेही कायदेशिर बांधकाम बेकायदेशीर मध्यरात्री तोडू नये़ रात्री कुठलेही बांधकाम तोडता येत नाही याबाबत पोलीस प्रशासनाने नियमानुसार ठेकेदारासह आमदार अनिल गोटे यांना नोटीस देऊन कारवाई करावी तसेच जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे़ 
पोलिसांचा बंदोबस्त
मोर्चा शांतते पार पडावा आणि कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, देवपूर पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते़ 

 

Web Title: Shiv Sena assembled against Dhonday MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.