शिवसेनेचा स्वबळाचा निर्णय फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 02:03 PM2018-12-10T14:03:40+5:302018-12-10T14:06:26+5:30

शिवसेनेचा जागा मिळविण्याचा आलेख घसरता कायम

Shivsena's own decision is ineffective | शिवसेनेचा स्वबळाचा निर्णय फसला

शिवसेनेचा स्वबळाचा निर्णय फसला

Next
ठळक मुद्देशिवसेनेला ७४ जागांवर उमेदवार मिळाले नाहीत.मुस्लिम बहुल भागात शिवसेनेला उमेदवारच मिळाले नाही.२०१८च्या निवडणुकीत दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही.


अतुल जोशी। 
आॅनलाइन लोकमत
धुळे : महापालिकेची निवडणूक प्रथमच स्वबळावर लढणाºया शिवसेनेला यावेळी दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. त्यांचा स्बळाचा निर्णय फसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. तसेच  लोकसंग्राम पक्षाने पाठिंबा देवूनही त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.  २००३ वगळता महापालिकेच्या चौथ्या निवडणुकीतही शिवसेनेचा जागा मिळविण्याचा आलेख घसरता कायम राहिला आहे.
यापूर्वी झालेल्या महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेने भाजपासोबत युती करूनच लढविली. मात्र आगामी काळात होणाºया लोकसभा,विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने भाजपापासून फारकत घेत स्वबळावर निवडणूका लढण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्याच अंगलट आल्याचे स्पष्ट झाले.
स्बळावर निवडणुकीला सामोरे जाणाºया शिवसेनेला ७४ जागांवर उमेदवार मिळाले नाहीत. त्यांना फक्त ४८ जागांवरच उमेदवार उभे करता आले. मुस्लिम बहुल भागात शिवसेनेला उमेदवारच मिळाले नाही. 
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ संपर्क प्रमुख के.पी.नाईक हे आठवडाभर शहरातच ठाण मांडून होते. तर उत्तर महाराष्टÑाचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत, पालकमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह अनेकजण शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात दाखल झाले होते.  तसेच निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी महापौर हा शिवसेनेचाच असेल अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारीत शिवसेनेला वरचढ होऊ देण्याची संधीच मिळू दिली नाही. 
महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ही चौथी निवडणूक होती. २००३ मध्ये महापालिकेची स्थापना झाली. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने ३५ पेक्षा जास्त जागा जिंकून प्रथम महापौरपद मिळविण्याचा बहुमान शिवसेनेला मिळाला होता. मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला हे यश कायम राखता आले नाही. २००८ मध्ये १६ तर २०१३ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला ११ जागांवर समाधान मिळाले होते. 
यावेळी स्बळाचा नारा देवून निवडणूक रिंगणात उतरलेल्या शिवसेनेला २०१८च्या निवडणुकीत दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. 
या निवडणुकीत शिवसेना व लोकसंग्राम पक्षांनी एकमेकांना पाठिंबा देवून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. तसेच शिवसेनेने ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेस, अपक्ष विद्यमान नगरसेवकांनाही पक्षात प्रवेश देवून ऐनवेळी उमेदवारी दिली होती. मात्र त्याचा पक्षाला काहीच उपयोग झालेला नाही. 
या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या जागावरून शहरात त्यांना किती समर्थन आहे, हे स्पष्ट झालेले आहे. 
दरम्यान महापालिकेसोबत शिवसेना विधानसभा, लोकसभेची निवडणूकही स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी त्यांना अजून किती तयारी करावी लागेल हे स्पष्ट होते आहे.
 

 

Web Title: Shivsena's own decision is ineffective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.