नंदुरबारला 811 जणांकडून वीज कंपनीला ‘शॉक’

By admin | Published: March 25, 2017 05:36 PM2017-03-25T17:36:26+5:302017-03-25T17:36:26+5:30

गेल्या वर्षभरात तीन पटीने वीज चोरी वाढल्याने वीज कंपनीलाच आर्थिक फटका बसून मोठा शॉक दिला जात आहे.

'Shock' to 811 people in Nandurbar | नंदुरबारला 811 जणांकडून वीज कंपनीला ‘शॉक’

नंदुरबारला 811 जणांकडून वीज कंपनीला ‘शॉक’

Next

नंदुरबार जिल्ह्यात वीज चोरी तिपटीने वाढली
नंदुरबार : जिल्ह्यामध्ये वीज चोरीच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून वर्षभरात 811 ठिकाणी वीज चोरी पकडण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात तीन पटीने वीज चोरी वाढल्याने वीज कंपनीलाच आर्थिक फटका बसून मोठा शॉक दिला जात आहे.
2015-2016 या वर्षात नंदुरबार विभागातर्फे 254 वीज चो:यांची प्रकरणे पकडण्यात आली  होती़ यातील 145 ग्राहकांकडून 19 लाख रुपयांची रक्कम दंडापोटी  वसूल केली होती़ यंदा 2016-2017 या आर्थिक वर्षात वीज चो:यांच्या प्रकणांमध्ये तीनपटीने वाढ  होत तब्बल 811 वीज चोरीचे प्रकरणे पकडण्यात आली आह़े  यातून आतार्पयत 382 ग्राहकांकडून 25 लाख रुपयांची वसुली करण्यात आली़ 

Web Title: 'Shock' to 811 people in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.