धक्कादायक! कपाशी वेचणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

By देवेंद्र पाठक | Published: February 28, 2023 07:00 PM2023-02-28T19:00:52+5:302023-02-28T19:01:05+5:30

साक्री तालुक्यातील घोडदे येथे कपाशी वेचण्यासाठी शेतात गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर मादी बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Shocking! A leopard attacks a farmer picking cotton | धक्कादायक! कपाशी वेचणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

धक्कादायक! कपाशी वेचणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला

googlenewsNext

धुळे - साक्री तालुक्यातील घोडदे येथे कपाशी वेचण्यासाठी शेतात गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर मादी बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्यातून तरुण थोडक्यात बचावला आहे. त्याच्या चेहऱ्यावर ८ ते १० टाके पडले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

साक्री तालुक्यातील घोडदे येथील तरुण शेतकरी मनोहर संभाजी क्षिरसागर (वय ३२) हा तरुण शेतकरी सोमवारी दुपारी आपल्या शेतात कपाशी काढण्यासाठी गेला होता. शेतातून कपाशी वेचणी झाल्यानंतर शेजारील १०० मीटर अंतरावर दुसऱ्या शेतात कपाशी वेचणी करण्यासाठी मजुराला सोडले. त्यनंतर पुन्हा पहिल्या शेतात आल्यानंतर त्याठिकाणी पाण्याची आऊटलेट बंद करत असताना दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास मादी बिबट्या व तिचे पिल्लू आले.

यावेळी मादी बिबट्याने मनाेहर क्षिरसागर याच्यावर अचानक हल्ला चढविला. या प्राणघातक हल्ल्यात शेतकरी मनोहर याच्या चेहऱ्यावर जखमा केल्या. त्यला ८ ते १० टाके पडले आहेत. भर दिवसा हा हल्ला झाल्याने परिसरात शेतकरींमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Shocking! A leopard attacks a farmer picking cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.